सागर लांगे युथ फाउंडेशनच्या वतीने खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा नागरि सत्कार संपन्न.

PCC NEWS

सागर लांगे युथ फाउंडेशनच्या वतीने खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा नागरि सत्कार संपन्न.

देहूरोड : (प्रतिनिधी) जातीयवादी,विकास कामांविरुद्ध आणि मोदीं विरुद्ध ही निवडणूक झाली. विकास कामांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या माणसांच्या मागे मतदार उभे राहिले नाही. तर जातीयवादी, विषारी प्रचार करण्याच्या मागे,जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या पाठीमागे मतदार उभी राहिली. म्हणून याच पद्धतीने मतदारांनी कौल दिला तर उद्याच्या कालावधीत या देशात काम करणाऱ्या माणसाला एक अस्थीरता मनात निर्माण होईल.अशी खंत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.

सागर लांगे युथ फाऊंडेशनच्या वतीने हॅट्रिक करणाऱ्या खासदार श्रीरंग बारणे यांची बाजार पेठेतून मिरवणूक आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार बारणे बोलत होते.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग माजी अध्यक्ष आजी-आराफत शेख, फाउंडेशनचे सागर लांगे,भाजपाचे रवींद्र भेगडे,माजी नगरसेवक विशाल खंडेलवाल,रघुवीर शेलार,मदन सोनीग्रा,शिवसेनेचे उप तालुका प्रमुख दिलीप पांढरकर,राजेंद्र तरस, राष्ट्रवादी युवकाध्यक्ष अशिष बंसल,अशपाक शेख आदी उपस्थित होते. फाउंडेशन च्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी,ढोल ताशांच्या गजरामध्ये सुमारे ४० फुट उंचीचा हार अर्पण करून खासदार बारणे यांचा सन्मान करण्यात आला.

मोदी बहुमताने आल्यावर संविधान बदलणार,३७० कलम बदलले.आता अल्पसंख्यांक,माणसांना,देशाला सुरक्षितता राहणार नाही.अशा प्रकारचा विरोधकांनी जहरी प्रचार विरोधी पक्षाच्या माध्यमातून केला. माझ्या बाबतीत ही जहरी प्रचार केला.” आप्पाने काम केले नाही,अप्पा दिसलेच नाही.मी म्हणतो, गणपतीने दूध पिले नाही,लोकांनी दूध पाजण्याचा प्रयत्न केला..” सातत्याने खोटे खोटे बोलुन पसरवल्याने लोकांना खरे वाटू लागते.

जो उमेदवार माझ्यासमोर होता.त्याचे अनेकांनी काम केले .तो ज्या भागात राहतो.त्या भागात २४०० हून अधिक मते मिळाले.ज्याचे कर्तुत्व,काम शून्य आहे.अशा माणसाच्या मागे केवळ जातीवादी प्रचार करून त्याच्या मागे उभे राहण्याचे काम काही लोकांनी केले.माझ्यामागे बोटावर मोजण्या इतकी सच्चे कार्यकर्ते होते.एक एक कार्यकर्ता लाखमोलाचा आहे. मी खासदार झालो.देहूरोडचा खासदार सागर असल्याचे गौरवद्गार यावेळी केले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक काम मावळ तालुक्यात मी केले आहे.सर्वाधिक निधी दिला आहे. यापुढेही सर्वाधिक काम करणार असल्याचे खा.बारणे यांनी यावेळी व्यक्त केले.

Contents
सागर लांगे युथ फाउंडेशनच्या वतीने खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा नागरि सत्कार संपन्न.देहूरोड : (प्रतिनिधी) जातीयवादी,विकास कामांविरुद्ध आणि मोदीं विरुद्ध ही निवडणूक झाली. विकास कामांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या माणसांच्या मागे मतदार उभे राहिले नाही. तर जातीयवादी, विषारी प्रचार करण्याच्या मागे,जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या पाठीमागे मतदार उभी राहिली. म्हणून याच पद्धतीने मतदारांनी कौल दिला तर उद्याच्या कालावधीत या देशात काम करणाऱ्या माणसाला एक अस्थीरता मनात निर्माण होईल.अशी खंत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.सागर लांगे युथ फाऊंडेशनच्या वतीने हॅट्रिक करणाऱ्या खासदार श्रीरंग बारणे यांची बाजार पेठेतून मिरवणूक आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार बारणे बोलत होते. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग माजी अध्यक्ष आजी-आराफत शेख, फाउंडेशनचे सागर लांगे,भाजपाचे रवींद्र भेगडे,माजी नगरसेवक विशाल खंडेलवाल,रघुवीर शेलार,मदन सोनीग्रा,शिवसेनेचे उप तालुका प्रमुख दिलीप पांढरकर,राजेंद्र तरस, राष्ट्रवादी युवकाध्यक्ष अशिष बंसल,अशपाक शेख आदी उपस्थित होते. फाउंडेशन च्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी,ढोल ताशांच्या गजरामध्ये सुमारे ४० फुट उंचीचा हार अर्पण करून खासदार बारणे यांचा सन्मान करण्यात आला.मोदी बहुमताने आल्यावर संविधान बदलणार,३७० कलम बदलले.आता अल्पसंख्यांक,माणसांना,देशाला सुरक्षितता राहणार नाही.अशा प्रकारचा विरोधकांनी जहरी प्रचार विरोधी पक्षाच्या माध्यमातून केला. माझ्या बाबतीत ही जहरी प्रचार केला.” आप्पाने काम केले नाही,अप्पा दिसलेच नाही.मी म्हणतो, गणपतीने दूध पिले नाही,लोकांनी दूध पाजण्याचा प्रयत्न केला..” सातत्याने खोटे खोटे बोलुन पसरवल्याने लोकांना खरे वाटू लागते.जो उमेदवार माझ्यासमोर होता.त्याचे अनेकांनी काम केले .तो ज्या भागात राहतो.त्या भागात २४०० हून अधिक मते मिळाले.ज्याचे कर्तुत्व,काम शून्य आहे.अशा माणसाच्या मागे केवळ जातीवादी प्रचार करून त्याच्या मागे उभे राहण्याचे काम काही लोकांनी केले.माझ्यामागे बोटावर मोजण्या इतकी सच्चे कार्यकर्ते होते.एक एक कार्यकर्ता लाखमोलाचा आहे. मी खासदार झालो.देहूरोडचा खासदार सागर असल्याचे गौरवद्गार यावेळी केले.देशाच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक काम मावळ तालुक्यात मी केले आहे.सर्वाधिक निधी दिला आहे. यापुढेही सर्वाधिक काम करणार असल्याचे खा.बारणे यांनी यावेळी व्यक्त केले.
TAGGED:
Share This Article
Leave a comment