एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमांतर्गत मुलांमध्ये पोलिसांकडून जनजागृती…
PCPoliceNews : पिंपरी दि. १७ डिसेंबर २०२३ एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत दोन आठवड्यात पिंपरी-चिंचवडच्या १२ हजार ३७६ मुलांना वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम, समाज माध्यामांचा योग्य वापर अशा गुन्ह्यांबाबात मार्गदर्शन केले. ७ डिसेंबर व १४ डिसेंबर या कालावधीत २० शाळांना १० टीमने भेटी देत मार्गदर्शन केले.
मुलांना शाळेतूनच चांगले वाईट याची जाण मिळाली तर मुले गुन्हेगारीकडे वळणार नाहीत किंवा त्यांना कोणी त्रास देणा नाही या भावनेतून पिंपरी-चिंचव़ड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून चांगला नागरिक चांगला माणूस हा उपक्रम राबविला आहे.
यावेळी पीपीटीवद्वारे मुलांना मुद्देसुदपणे कायदे व नियम यांची माहिती देण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या उपक्रमाला विद्यार्थी व शाळांनी उत्तम प्रतिसाद दिला. १ अधिकारी व २ अमंलदार अशा २० टीम यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.