पिंपरी विधानसभेवर आमचा दावा- शहराध्यक्ष सचिन भोसले.
पिंपरी : दिनांक 21 सप्टेंबर 2024 (पिसीसी न्यूज प्रतिनिधी) वर्षभरापासून पिंपरी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बूथ व पन्नाप्रमुख युद्धपातळीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले हे काम करत आहेत. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आपला दावा सांगितला आहे.
सचिन भोसले म्हणाले की, जागावाटपात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला पिंपरी विधानसभेची जागा मिळाल्याचे ते म्हणतात, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. यामुळे आमचा ठाम दावा या जागेवर आहे. परंतु शेवटी मातोश्रीकडून जो काही आदेश येईल, तो आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पाळणार आहोत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन भोसले यांचा 23 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया गोसावी मंदिर, चिंचवड, शिवमंदिर येथे अभिषेक होणार आहे. आकुर्डी येथील खंडोबामाळ येथे हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजल्यापासून सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक प्रमुख सचिन अहिर, रवींद्र मिर्लेकर, संजोग वाघेरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच पिंपरी विधानसभेतील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे. या शिबिरात 38 प्रकारच्या चाचण्या होणार आहेत. तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असेही आवाहन सचिन भोसले यांनी केले आहे.
पिंपरी विधानसभेवर आमचा दावा- शहराध्यक्ष सचिन भोसले.पिंपरी : दिनांक 21 सप्टेंबर 2024 (पिसीसी न्यूज प्रतिनिधी) वर्षभरापासून पिंपरी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बूथ व पन्नाप्रमुख युद्धपातळीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले हे काम करत आहेत. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आपला दावा सांगितला आहे.सचिन भोसले म्हणाले की, जागावाटपात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला पिंपरी विधानसभेची जागा मिळाल्याचे ते म्हणतात, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. यामुळे आमचा ठाम दावा या जागेवर आहे. परंतु शेवटी मातोश्रीकडून जो काही आदेश येईल, तो आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पाळणार आहोत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन भोसले यांचा 23 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया गोसावी मंदिर, चिंचवड, शिवमंदिर येथे अभिषेक होणार आहे. आकुर्डी येथील खंडोबामाळ येथे हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजल्यापासून सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक प्रमुख सचिन अहिर, रवींद्र मिर्लेकर, संजोग वाघेरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच पिंपरी विधानसभेतील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे. या शिबिरात 38 प्रकारच्या चाचण्या होणार आहेत. तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असेही आवाहन सचिन भोसले यांनी केले आहे.