सांगवी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. – युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख.

PCC NEWS

आपल्या जवळची व्यक्ती जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत असताना आपल्याला रक्तदानाचे महत्त्व कळते.- युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख.

सांगवी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

पिंपरी चिंचवड, दि. ८ जुलै २०२४ संसदरत्न माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या वतीने  सांगवी येथे ‘रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.एकूण ९४ लोकांनी रक्तदान केले.

यावेळी बोलताना युवक शहरअध्यक्ष म्हणाले की ‘आपले दान केलेले रक्त अनेकांचे प्राण वाचवते आपल्या जवळची व्यक्ती जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत असताना आपल्याला रक्तदानाचे महत्त्व कळते. रक्तदान केल्याने एकीकडे आपण कोणाचे तरी प्राण वाचवतो तर दुसरीकडे आपल्याला प्रचंड आत्म-समाधान मिळते.रक्तदानाविषयी गैरसमजांमुळे अनेक लोक रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात, जरी यामुळे कोणतेही नुकसान होत नसले तरी त्याचे अनेक फायदे आहेत.वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे देशभरात दररोज १८०० ते २००० व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागतात ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदानासाठी स्वतः हून पुढे आले पाहिजे.’या शिबिरात युवक,पुरुषांबरोबर महिलांनी देखील मोठ्या संख्येने रक्तदान केले.युवक शहराध्यक्ष  इम्रानभाई शेख यांच्या मार्गदर्शना खाली तसेच युवकचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे आणि युवक पदाधिकारी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख,महिला शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर,जेष्ठ नेते शहरकार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,वरिष्ठ मार्गदर्शक प्रियाताई देशमुख, भोसरीच्या मा नगरसेवक प्रियंकाताई बारसे,सचिन भाऊ निंबाळकर,शहर उपाध्यक्ष रेखाताई मोरे, विधानसभा उपाध्यक्ष सोनाली नितनवरे, ताहिराबी सय्यद,प्रशांत काळेल,मयुर खरात,आश्रफ शेख,अवधूत कदम,सिद्धांत जानराव,प्रणव मस्के,तेजस आवळे रोहन उत्तेकर,शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित सुहासे,प्रभाग अध्यक्ष नवी सांगवी अभिषेक मेमसादे,तेजस पाटील,आशिष खत्री,साहिल शेख,निखिल पवार,कार्तिक कदम,देवांग भिंगर्डे,पीयूष धोर्मले,साहिल भिंगर्डे,दीप वाघमारे,अथर्व जगदाळे,ओम शिरसागर,पियुष अंकुश,गौरव शिंदे,अभिषेक गिरी, जयेश गौरकर,सार्थक बाराते, कौस्तुभिक नवरे, मोसिन शेख,सिद्धार्थ गायकवाड,दिप आंब्रे,विद्यार्थी काँग्रेस चिंचवड विधानसभेचे मुख्य सरचिटणीस अरबाज खान महाविद्यालयीन समन्वयक स्वप्नील भाऊ खंडागळे आणि महाविद्यालयीन अध्यक्ष आर्यन धोत्रे,अरबाज शेख,साहिल वाघमारे,मयूर खरात व सर्व उपस्थित होते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment