राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर मधुकर चिंचवडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते.

PCC NEWS

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर मधुकर चिंचवडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते.

सागर मधुकर चिंचवडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी शहर अध्यक्ष तुषार कामठे आणि प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे उपस्तिथ होते.

रोहित पवार यावेळी म्हणाले की पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी निर्णायक भूमिका जर कोणी बजावलीअसेल तर ती भूमिका बजावणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हेच आहेत.
मागील काळात साहेब केंद्रीय मंत्री असताना जेएनएनयुआर एम प्रकल्पांतर्गत 3500 हजार कोटी रकमेची तरतूद साहेबांनी पिंपरी चिंचवड शहरासाठी उपलब्ध करून दिली.

या भरीव निधीमुळेच पिंपरी चिंचवड शहरात आज अस्तित्वात असलेले उड्डाणपूल, प्रमुख रस्ते,उद्याने,दवाखाने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम होण्यासाठी आवश्यक असलेले नाट्यगृहे,
अग्निशमन केंद्र,सायन्स पार्क,ऑटोक्लस्टर आहे. पण 2014 नंतर म्हणावी तशी प्रगती या शहराची झाली नाही. सागर चिंचवडे म्हणाले की
आज शहरातील स्थानिक भूमीपुत्रांना जी काही आर्थिक सुबत्ता मिळवता आली आहे त्या पाठीमागे माननीय पवार साहेब यांचे मागील 30 ते 35 वर्षाचे योगदान आहे हे शहरातील प्रत्येक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य करावेच लागेल.

प्रसंगी काही नियुक्त्या करण्यात आल्या.

1)चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षपदी आशिष पांढरे
2)चिंचवड विधानसभा सरचिटणीस पदी अमित तलाठी
3)चिंचवड प्रभाग क्रमांक 17 अध्यक्षपदी नागेश सदावर्ते
4)चिंचवड प्रभाग क्रमांक 18 अध्यक्षपदी मयूर आरसुळ.

उदघाटन कार्यक्रम निमित्ताने आधार कार्ड दुरुस्ती अभियान 1 जानेवारी ते 3 जानेवारी 2024 आयोजित केले होते त्यादरम्यान 756 नागरिकांनी सहभाग नोंदवला तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यादरम्यान 581 नागरिकांनी रक्तदान केले.

यावेळी राज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनील गव्हाणे,इंडिया आघाडी समन्वयक मानव काका कांबळे,मावळ लोकसभा निरीक्षक माधवी जोशी,राज्य डॉक्टर सेल प्रमुख डॉ सतीश कांबळे,मा नगरसेवक गणेश अण्णा भोंडवे, प्रदेश युवकचे प्रशांत सकपाळ,ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव,मा. नगरसेविका जनाबाई जाधव,महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर,संगीताताई जाधव,पोलीस मित्र मालुसरे काका,संतोष माळी, अनिल भोसले,विवेक विधाते, अशोक तनपुरे, राहुल धनवे व पक्षाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आभार प्रदर्शन ऍड.निकिता सागर चिंचवडे यांनी केले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment