बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे स. ११.०० वा. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष मा. श्री. अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज हा देश एकसंघ आहे, त्यामुळे अनेक जाती धर्मांचे लोक गुणागोंविदाने एकत्र नांदताना दिसतात ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या भारतीय संविधाना मुळेच..!
असे थोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागरास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्यावतीने अभिवादन करतो.
तसेच प्रदेश सरचिटणीस ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनाचा आढावा समस्त जनांसमोर मांडला, बाबासाहेबांची आंबेडकरी लोकशाही जगाचे तत्वज्ञान ठरलेली असून, पुढे देश प्रगती पथावर घेऊन जाण्याकरिता आंबेडकरांचे विचाराच देशाला तारक ठरतील असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेकेले.
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज हा देश एकसंघ आहे
या वेळी (NCP) शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष गंगा धेंडे.
भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, खजिनदार दिपक साकोरे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, पर्यावरण सेल अध्यक्ष विनय शिंदे, झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष निसर्गध, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला शहर कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, व्ही.जे.एन.टी. सेल महिला अध्यक्ष निर्मला माने, महिला प्रदेश सरचिटणीस शोभा पगारे, तेजस सिंह, पिंपरी विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष अबरार शेख.
भोसरी विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष अथर्व कोकणे, उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, कुमार कांबळे, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, सरचिटणीस रवींद्र सोनवणे,उदय ववले, वॉर्ड अध्यक्ष रिजवाना सय्यद, शेनाज जकाते, जावेद जकाते, प्रथमेश कांबळे, मकरंद शिंदे, मनिष शेडगे, समर्थ गव्हाणे, चैतन्य सोनवणे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यांदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक. | Pune Mumbai Road Block