भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नाम फलकाचे अनावरण.

PCC NEWS

भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नाम फलकाचे अनावरण.

पिंपरी चिंचवड (माळुंगे) दिनांक १५ जुलै २०२४ (प्रतिनिधी) संधार टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड महाळुंगे येथे भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नामपलकाचे उद्घाटन मा.शिवाजी श.पाटील (अध्यक्ष, म.राज्य भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ), निवडणूक प्रमुख – चंदगड विधानसभा मतदारसंघ, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने तसेच आधारस्तंभ महेश दादा लांडगे (आमदार भोसरी विधानसभा) यांच्या सल्ल्यानुसार कविताताई भोगाळे सरचिटणीस भाजपा पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले.

नामपलकाच्या अनावर प्रसंगी संधार टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड माळुंगे (कोरेगाव बोरदरा) येथील प्लांट हेड गणेश सर व कर्मचारी सभासद उपस्थित होते.

तसेच पुणे श्री बॉडी बिल्डर रवी मंचद, मॉर्डन श्री बॉडी बिल्डर रोहित दौंड, नरेंद्र वाळुंज, भरतभाई, मंगेश गुरव भूषण चव्हाण सुरज गवस, कर्मचारी वर्ग-विशाल भोर तुषार मांजरे, रोहित मांजरे, अमित भोर, दीपक बोराडे, प्रशांत करंडे,प्रसाद गाढवे, इत्यादी उपस्थित होते.

पुणे जिल्हाध्यक्ष विजय भोसुरे यांच्या सुचनेनुसार सदर उद्घाटन संपन्न झाले.

कर्मचारी वर्गाला संबोधित करताना पुणे जिल्हाध्यक्ष विजय भोसुरे यांनी कर्मचारी वर्गाला आश्वासन दिले की संघटना तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही संघटनेशी संपर्क साधा.

उद्घाटक कविताताई भोंगाळे यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की तुम्ही कंपनीला सहकार्य करा कंपनी तुम्हाला सहकार्य करेल काही गरज भासल्यास संघटना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.

भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ पुण्याचे कायदेशीर सल्लागार श्री घावटे काका व इतर कर्मचारी वर्गांने सर्वांचे आभार मानले.

खेळीमेळीच्या वातावरणातत नामपलकाचे उद्घाटन संपन्न झाले, लाडू वाटून कर्मचाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला.

Contents
भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नाम फलकाचे अनावरण.पिंपरी चिंचवड (माळुंगे) दिनांक १५ जुलै २०२४ (प्रतिनिधी) संधार टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड महाळुंगे येथे भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नामपलकाचे उद्घाटन मा.शिवाजी श.पाटील (अध्यक्ष, म.राज्य भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ), निवडणूक प्रमुख – चंदगड विधानसभा मतदारसंघ, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने तसेच आधारस्तंभ महेश दादा लांडगे (आमदार भोसरी विधानसभा) यांच्या सल्ल्यानुसार कविताताई भोगाळे सरचिटणीस भाजपा पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले.नामपलकाच्या अनावर प्रसंगी संधार टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड माळुंगे (कोरेगाव बोरदरा) येथील प्लांट हेड गणेश सर व कर्मचारी सभासद उपस्थित होते.तसेच पुणे श्री बॉडी बिल्डर रवी मंचद, मॉर्डन श्री बॉडी बिल्डर रोहित दौंड, नरेंद्र वाळुंज, भरतभाई, मंगेश गुरव भूषण चव्हाण सुरज गवस, कर्मचारी वर्ग-विशाल भोर तुषार मांजरे, रोहित मांजरे, अमित भोर, दीपक बोराडे, प्रशांत करंडे,प्रसाद गाढवे, इत्यादी उपस्थित होते.पुणे जिल्हाध्यक्ष विजय भोसुरे यांच्या सुचनेनुसार सदर उद्घाटन संपन्न झाले.कर्मचारी वर्गाला संबोधित करताना पुणे जिल्हाध्यक्ष विजय भोसुरे यांनी कर्मचारी वर्गाला आश्वासन दिले की संघटना तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही संघटनेशी संपर्क साधा.उद्घाटक कविताताई भोंगाळे यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की तुम्ही कंपनीला सहकार्य करा कंपनी तुम्हाला सहकार्य करेल काही गरज भासल्यास संघटना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ पुण्याचे कायदेशीर सल्लागार श्री घावटे काका व इतर कर्मचारी वर्गांने सर्वांचे आभार मानले.खेळीमेळीच्या वातावरणातत नामपलकाचे उद्घाटन संपन्न झाले, लाडू वाटून कर्मचाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला.
TAGGED:
Share This Article
Leave a comment