मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु – वाघेरे पाटील.
मराठी नववर्षाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्याकडून शुभेच्छा..!
पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी “मशाल” पेटवून आपल्याला विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु, असे आवाहन करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
लोकसभा निवडणुकांचे वारे देशात आणि राज्यात वाहत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी सर्वांच्या साथीने विजयाची गुढी उभारणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात परिवर्तन आणि विकासात्मक बदल करायचा आहे. तो बदल करण्यासाठी आपल्या सर्वांची सोबत अतिशय महत्वाची आहे. या लोकसभा निवडणुकीत कोणाच्याही दबावाला आणि भूलथापांना बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन देखील या निमित्ताने त्यांनी केली.
मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु – वाघेरे पाटील.मराठी नववर्षाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्याकडून शुभेच्छा..!पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी “मशाल” पेटवून आपल्याला विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु, असे आवाहन करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.लोकसभा निवडणुकांचे वारे देशात आणि राज्यात वाहत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी सर्वांच्या साथीने विजयाची गुढी उभारणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.ते म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात परिवर्तन आणि विकासात्मक बदल करायचा आहे. तो बदल करण्यासाठी आपल्या सर्वांची सोबत अतिशय महत्वाची आहे. या लोकसभा निवडणुकीत कोणाच्याही दबावाला आणि भूलथापांना बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन देखील या निमित्ताने त्यांनी केली.