लोकशाही युवा फाऊंडेशनकडून ज्ञानेश्वर कांबळे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती
सामाजिक न्याय, समता आणि संविधान रक्षणाच्या लढ्यास अधिक बळ
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब पिंपरी चिंचवड दिनांक 31 मार्च 2026 लोकशाही युवा फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ज्ञानेश्वर बाबू कांबळे (रा. बालाजी नगर, पावर हाऊस परिसर, टेल्को रोड, भोसरी, पुणे) यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन मौलाली शेख यांनी दिनांक १६ मार्च २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली.
या नियुक्तीद्वारे कांबळे यांच्यावर राज्य पातळीवर संघटन विस्तार, सामाजिक चळवळींना गती देणे आणि विविध वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी लढा उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी तसेच बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी प्रभावी भूमिका बजावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
संस्थेच्या वतीने जातीयतेविरोधात ठाम भूमिका घेत संविधान रक्षणासाठी लढा अधिक तीव्र करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत व्यापक जनआंदोलन उभे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
संस्थापक अध्यक्ष शेख यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, कांबळे हे संघटनेच्या ध्येयधोरणांनुसार काम करत लोकशाही युवा फाऊंडेशनला अधिक बळकट करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
लोकशाही युवा फाऊंडेशनचे मुख्य मध्यवर्ती कार्यालय चिंचवड येथे असून, राज्यभर संघटन विस्तारावर संस्थेचा भर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

लोकशाही युवा फाऊंडेशनकडून ज्ञानेश्वर कांबळे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्तीसामाजिक न्याय, समता आणि संविधान रक्षणाच्या लढ्यास अधिक बळपिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब पिंपरी चिंचवड दिनांक 31 मार्च 2026 लोकशाही युवा फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ज्ञानेश्वर बाबू कांबळे (रा. बालाजी नगर, पावर हाऊस परिसर, टेल्को रोड, भोसरी, पुणे) यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन मौलाली शेख यांनी दिनांक १६ मार्च २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली.या नियुक्तीद्वारे कांबळे यांच्यावर राज्य पातळीवर संघटन विस्तार, सामाजिक चळवळींना गती देणे आणि विविध वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी लढा उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी तसेच बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी प्रभावी भूमिका बजावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.संस्थेच्या वतीने जातीयतेविरोधात ठाम भूमिका घेत संविधान रक्षणासाठी लढा अधिक तीव्र करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत व्यापक जनआंदोलन उभे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.संस्थापक अध्यक्ष शेख यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, कांबळे हे संघटनेच्या ध्येयधोरणांनुसार काम करत लोकशाही युवा फाऊंडेशनला अधिक बळकट करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.लोकशाही युवा फाऊंडेशनचे मुख्य मध्यवर्ती कार्यालय चिंचवड येथे असून, राज्यभर संघटन विस्तारावर संस्थेचा भर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
