फक्त आमदार महेश लांडगे जनसंपर्क कार्यालय फलक नको.- सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर.
पिपरी- चिंचवड प्रतिनिधी
आमदार महेश लांडगे जनसंपर्क कार्यालय असा फलक निगडी गावठाण प्रसन्न पुरम बिल्डींग समोर कॉर्नर यमुना नगर कडे जाताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या कडून लावण्यात आला असून निगडी भागातील सामान्य नागरिक ह्यांना प्रश्न पडला आहे की भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे ह्याचे जनसंपर्क कार्यालय निगडी गावठाण किंवा यमुना नगर भागात कुठेही नसून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी का बरं आमदार महेश लांडगे ह्यांचा जनसंपर्क कार्यालय फलक लावण्यात आला आहे
बरं हा प्रश्न सतत मनात शंका घेत आहे आमदार महेश लांडगे ह्याचे निगडी गावठाण तसेच यमुना नगर भागात कुठेही जनसंपर्क कार्यालय नसून त्यामुळे नागरिकांना विनाकारण निगडी भागात हेलपाटे मारावे लागत आहेत
आमदार महेश लांडगे ह्याचे जनसंपर्क कार्यालय कुठे आहे किंवा आमदार महेश लांडगे निगडी गावठाण तसेच यमुना नगर भागात कुठे भेटणार वगैरे प्रश्न सतत मनात शंका घेत आहे
पण आमदार महेश लांडगे ह्याचे जनसंपर्क कार्यालय निगडी गावठाण तसेच यमुना नगर भागात नसून तरीही पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी आमदार महेश लांडगे ह्याचे जनसंपर्क कार्यालय फलक निगडी गावठाण भागात लावला असून आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन आमदार महेश लांडगे ह्याचे जनसंपर्क कार्यालय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून वारंवार आमदार महेश लांडगे ह्याचे जनसंपर्क कार्यालय शोधाशोध करायला लागणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी शालेय विद्यार्थी ह्यांना प्रवेश मिळवण्यासाठी तसेच लाईट बील समस्या पाणी पुरवठा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून त्या संदर्भात समस्या निराकरण करण्यासाठी तसेच शिफारस पत्र किंवा इतर नागरी समस्या निराकरण करण्यासाठी आमदार महेश लांडगे ह्याचे जनसंपर्क कार्यालय फलक लावण्यात आल्या मुळे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग शालेय विद्यार्थी ह्यांना हेलपाटे मारावे लागणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी आमदार महेश लांडगे ह्याचे जनसंपर्क कार्यालय निगडी भागात सुरू करुन देण्यात यावे फक्त आमदार महेश लांडगे जनसंपर्क कार्यालय फलक नको तर आमदार महेश लांडगे जनसंपर्क कार्यालय सुरू करुन देण्यात यावे ही विनंती सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर यांनी केलेली आहे.