जिजामाता रुग्णालय गैरव्यवहाराची चौकशी होणार रुग्णालय गैरव्यवहाराची चौकशी होणार..

PCC NEWS

जिजामाता रुग्णालय गैरव्यवहाराची चौकशी होणार.

पिंपरी चिंचवड दिनांक ५ :- महानगरपालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये उपचार शुल्क पोटी रुग्णांकडून घेतलेल्या पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. जिजामाता रुग्णालय झालेल्या अपहरणाबाबत लिपिक आकाश गोसावी रुग्णालयात रुजू झाल्यापासून ते अपहार झाल्याच्या दिनांक पर्यंतच्या सर्व अभिलेखांची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

जिजामाता रुग्णालय मध्ये उपचार शुल्कापोटी रुग्णांकडून घेतलेल्या पैशावर वैद्यकीय अधिकारी व लिपिकाने डल्ला मारला‌. शुल्कापोटी १८ लाख ६६ हजार ३५६ रुपये जमा झाले असताना बँकेत फक्त ८लाख ८९ हजार ६६५ रुपये भरले आहेत. ९ लाख ७६ हजार ६९१ रुपयांचा भ्रष्टाचार आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे जिजामाता रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिता साळवे लिपिक आकाश गोसावी यांनी केला असले चा आरोप पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिलेले आहेत.

जिजामाता रुग्णालयात झालेल्या अपहाराबाबत लिपिक आकाश गोसावी हे रुग्णालयात म्हणजेच सण २०२१ पासून ते अपहर झाल्याच्या दिनांकापर्यंत या प्रकरणाशी संबंधित पावत्या पुस्तके, चलने, बिले व सर्व अभिलेखाचे तातडीने पथक नेमून १५ दिवसात लेखी परीक्षण करावे. तसेच यामध्ये एकूण किती रक्कम मापहार झालेले आहे ते निश्चित करावे तसेच या प्रकरणाला कोण कोण जबाबदार आहे. याबाबतचा अहवाल १५ दिवसात सादर करावा.असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

Share This Article
Leave a comment