हिंदू जन आक्रोश मोर्चात मुस्लिम समाजाविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण – पिंपरी चिंचवड काँग्रेस अल्पसंख्याक विभागाकडून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रार
पिंपरी चिंचवड, दि. १८ ऑक्टोबर (युनूस खतीब)
बिड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या “हिंदू जन आक्रोश मोर्चा” या कार्यक्रमात मुस्लिम समाजाविरुद्ध केलेल्या अपमानजनक आणि भडकावणाऱ्या वक्तव्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाने मुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार तसेच अल्पसंख्याक आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.

शहराध्यक्ष शहाबुद्दीन एम. शेख यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बिड येथे झालेल्या या मोर्चात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, नेते मिलिंद एकबोटे, संग्राम भांडारे आणि अन्य वक्त्यांनी मुस्लिम समाजाविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण आणि भडकावणारी वक्तव्ये केली. विशेषतः “**ड्या” सारख्या अश्लील शब्दांचा वापर करून मुस्लिम समाजाचा उघड अपमान करण्यात आला असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या वक्तव्यांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, ही कृत्ये भारतीय दंड संहिता कलम १५३ए, ५०५ तसेच महाराष्ट्र धार्मिक निषेध कायदा १९७० अंतर्गत गुन्हा ठरतात, असेही निवेदनात नमूद केले आहे.
अल्पसंख्याक विभागाने सरकारला खालील मागण्या केल्या आहेत
१️⃣ संबंधित वक्ते व आयोजकांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा.
२️⃣ चौकशी करून कठोर शिक्षा करावी.
३️⃣ अशा द्वेषपूर्ण कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत.
४️⃣ अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
२️⃣ चौकशी करून कठोर शिक्षा करावी.
३️⃣ अशा द्वेषपूर्ण कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत.
४️⃣ अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात.