साईनाथ नगरमध्ये २५२ सदनिकांचे चावी वाटप; झोपडीधारकांचे ‘स्मार्ट होम’मध्ये पुनर्वसन

PCC NEWS
1 Min Read
Pccnews Reporter Yunus Khatib

साईनाथ नगरमध्ये २५२ सदनिकांचे चावी वाटप; झोपडीधारकांचे ‘स्मार्ट होम’मध्ये पुनर्वसन

पिंपरी चिंचवड, दि. २८ मार्च २०२६ :
साईनाथ नगर, नेहरूनगर येथे एसआरए अंतर्गत उभारलेल्या आर.के. प्लाझा इमारतीतील २५२ सदनिकांचे चावी वाटप उत्साहात पार पडले. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे आणि माजी महापौर हनुमंतराव भोसले यांच्या हस्ते लाभार्थींना चाव्या देण्यात आल्या.

या वेळी नगरसेवक राहुल भोसले, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, सिद्धार्थ बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते विशाल मासुळकर व विकासक राजेंद्र कदम यांसह मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पात घरांसोबत गॅस शेगडी, गिझर, वॉशिंग मशीन, पाणी फिल्टर, वायफाय व केबल कनेक्शन अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच अशा सुविधायुक्त सदनिका देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

नगरसेवक राहुल भोसले यांच्या पुढाकारातून आतापर्यंत ५ हजारांहून अधिक झोपडीधारकांना पक्की घरे मिळाली आहेत. मान्यवरांनी लाभार्थींना शुभेच्छा देत घरांची स्वच्छता व निगा राखण्याचे आवाहन केले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment