चंद्रकांत लोंढे यांनी पिंपरी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले.

PCC NEWS

चंद्रकांत लोंढे यांनी पिंपरी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे आपला कार्य अहवाल सोपवत केली विधानसभेची सुरुवात.

पिंपरी चिंचवड दिनांक २० जुलै २०२४ (पिसीसी न्यूज प्रतिनिधी) राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेबर – ऑक्टोबर २०२४ मध्ये होत आहेत. मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरुन या निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

206 पिंपरी विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांतदादा लोंढे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे आपला कार्य अहवाल पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष डॉ कैलास कदम तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक पदाधिकारी यांच्या समवेत सादर केला व आपल्या परिचय पत्राचे त्यांच्या हस्ते अनावरण केले,सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर दीपा चक्रवर्ती व काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ गावंडे साहेब, प्रज्ञा वाघमारे मॅडम विभाग व सेल प्रमुख महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आणि सामाजिक न्याय विभागाच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या समवेत उमेदवारी अर्ज टिळक भवन,काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरला, यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा यांना ठिळक भवन मुंबई या ठिकाणी भेटून पिंपरी विधानसभा मतदारसंघ साठी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार मा.चंद्रकांत लोंढे यांनी आपलं परिचय पत्र देऊन सुरुवात केली.

सोबत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष समिर भाई शेख उपस्थित होते.

Contents
चंद्रकांत लोंढे यांनी पिंपरी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले.महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे आपला कार्य अहवाल सोपवत केली विधानसभेची सुरुवात.पिंपरी चिंचवड दिनांक २० जुलै २०२४ (पिसीसी न्यूज प्रतिनिधी) राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेबर – ऑक्टोबर २०२४ मध्ये होत आहेत. मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरुन या निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.206 पिंपरी विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांतदादा लोंढे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे आपला कार्य अहवाल पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष डॉ कैलास कदम तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक पदाधिकारी यांच्या समवेत सादर केला व आपल्या परिचय पत्राचे त्यांच्या हस्ते अनावरण केले,सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर दीपा चक्रवर्ती व काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ गावंडे साहेब, प्रज्ञा वाघमारे मॅडम विभाग व सेल प्रमुख महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आणि सामाजिक न्याय विभागाच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या समवेत उमेदवारी अर्ज टिळक भवन,काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरला, यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा यांना ठिळक भवन मुंबई या ठिकाणी भेटून पिंपरी विधानसभा मतदारसंघ साठी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार मा.चंद्रकांत लोंढे यांनी आपलं परिचय पत्र देऊन सुरुवात केली.सोबत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष समिर भाई शेख उपस्थित होते.
TAGGED:
Share This Article
Leave a comment