अजित पवारांच्या स्ट्रॅटेजिक मास्टरस्ट्रोकमुळे राष्ट्रवादी मजबूत स्थितीत.

PCC NEWS

अजित पवारांच्या स्ट्रॅटेजिक मास्टरस्ट्रोकमुळे राष्ट्रवादी मजबूत स्थितीत.

अजित पवारांचं मोठ यश : अणुशक्ती नगर आणि दिंडोरीतील शिवसेना-शिंदे गटातील उमेदवारांनी घेतली माघार.

महाराष्ट्र दिनांक: ०४ नोव्हेंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं यश. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून अविनाश हैबत राणे आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून धनराज हरिभाऊ महाले यांनी आज माघार घेतली.

दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीने दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी दिली आहे. अणुशक्ती नगरमध्ये पक्षाने ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी राष्ट्रवादी आणि महायुतीसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. महायुतीची निवडणूक शक्यता अधिक भक्कम करण्यासाठी दोन्ही उमेदवारांना माघारी बोलावण्यात अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.यामुळे पक्षाची ताकद मजबूत करण्याची आणि मित्रपक्षांमध्ये एकता राखण्याची त्यांची क्षमता दर्शवते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment