हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त (भव्य रक्तदान शिबिर) आरोग्य सेवा उपक्रम
पिंपरी, दि. १६ हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध आरोग्य सुविधा आणि जनजागृतीसाठी भव्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज पालखी तळ, विठ्ठल मंदिरासमोर, विठ्ठलवाडी आकुर्डी येथे रविवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे.
कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिर, ज्यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास एअरबर्ड हेडफोन किंवा स्मार्ट वॉच भेटवस्तू, तसेच मोफत रक्त तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोफत बॉडी फॅट चेकअप (मशीनद्वारे) आणि मोफत कांस्य मशीन मसाज यांसारख्या सेवा देण्यात येणार आहेत. याशिवाय कार्य अहवाल प्रकाशन सोहळा देखील आयोजित केला आहे.
या उपक्रमांचे आयोजन निखिल उमाकांत दळवी, उपशहरप्रमुख – युवासेना पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निखिल दळवी, यांनी केले आहे.