“दिवाळीची मोठी भेट: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक वेतनवाढ — सहा वर्षांच्या संघर्षाला यश”

PCC NEWS
3 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1,"effects":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

“दिवाळीची मोठी भेट: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक वेतनवाढ – सहा वर्षांच्या संघर्षाला यश”

छत्रपती संभाजी नगर, दि. 17 ऑक्टोबर
राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर ऐतिहासिक यश मिळाले आहे. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) महानगरपालिकेतील सुमारे 2,500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानुसार किमान वेतन लागू करण्यात आले असून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनात ₹2,300/- इतकी लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. ही वाढ गेल्या दोन महिन्यांच्या वेतनात लागू झाली असून यामुळे कामगारांमध्ये ‘खरी दिवाळी’ साजरी झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेत विविध विभागांत कार्यरत असलेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. या अन्यायाविरोधात श्रमिक आघाडीने सातत्याने आंदोलन, मोर्चे, उपोषणे केली, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, तसेच कामगार विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. या संघर्षामुळे प्रशासनाने काही काळ रागातून सुमारे 250 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी श्रमिक आघाडीने पुन्हा लढा सुरू ठेवला. कामगार आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यासंदर्भात पत्र दिले, तसेच मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. शेवटी, प्रशासनाने किमान वेतन लागू करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ आणि पेढ्यांनी अभिनंदन करून पुण्याला रवाना झाले.

महापालिकेकडून मिळालेल्या या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन ₹13,000/- वरून ₹23,000/- इतके झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. लढ्यादरम्यान ज्यांना कामावरून कमी करण्यात आले होते त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणे, सेवेत कायम करणे आणि कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासाठी न्यायालयीन लढा सुरूच राहणार असल्याची माहिती श्रमिक आघाडीच्या नेतृत्वाने दिली.

या लढ्यात श्री. संदिपान काचे, सिद्धार्थ ढाले, भरत कुलकर्णी, अनिल मोमय्या, प्रशांत जाधव, शिला जाधव, रुबीना कुरेशी, अरिफ खान, अब्रार खान, अनिल बिडकर, राजरत्न महापुरे, दिपक गाडेकर, प्रवीण म्हस्के, निलेश भांगे, राजू खरात, रवींद्र झोंबाडे, फिरोज खान, फकिरा खरात, तुकाराम पवार, सुभाष काने, बाबासाहेब ताटे, संदिप आदमने, सुमित आदमने, बाळू चव्हाण, सुमित गव्हाळे, स्वप्नील अवताडे, बाबासाहेब रोडे, शुभम राजपूत, नितीन नवटक्के, अजय साठे, यमुना कापसे, आदित्य बोडके, कविता शेजवळ आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

या विजयामुळे छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी आर्थिक दिलासा मिळाली असून संघटनेच्या या यशाचे कामगार वर्गातून जोरदार स्वागत केले जात आहे.

Share This Article
Leave a comment