PCMC NEWS; खेळाडू दत्तक योजनेचा महापालिकेला पडला विसर?
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने महापालिकेची खेळाडू दत्तक योजना सुरू करण्यासाठी आज अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले ?
“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील उदयोन्मुख आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या खेळाडूंकरिता पिंपरी-चिंचवड (PCMC NEWS) मनपा तर्फे गेली अनेक वर्ष खेळाडू दत्तक योजना सुरू होती. या योजनेतून विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना महापालिकेकडून आर्थिक हातभार लावला जात होता. परंतु कोविड-19 च्या प्रभावानंतर सदर योजना बंद करण्यात आली. दोन वर्ष उलटून गेले तरी ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शहरातील उद्योन्मुख व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तरी शहराचे व राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या खेळाडूंकरिता माननीय आयुक्त साहेबांनी सदर योजना पुनर्जीवित करावी व शहरातील गोरगरीब खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केली गेली. मागणी मान्य केल्यास महापालिका प्रशासनाविरुद्ध जन आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा इम्रान शेख यांनी दिला.”
हे देखील वाचा: NCP च्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.
या वेळी बोलताना कार्याध्यक्ष सागर तापकीर म्हणाले
” ऋतुराज गायकवाड सारखा पिंपरी-चिंचवड (PCMC NEWS) मधील एक खेळाडू आज देशाचा प्रतिनिधित्व करत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून देशाचं नावलौकिक करणारे मोठ्या संख्येने खेळाडू असून त्यांना आर्थिक मदत पोहोचली पाहिजे.”
या वेळी ऍड संतोष शिंदे म्हणाले
“खेळाडू दत्तक योजनेत काही निवडक खेळांना स्थान न देता ऑलिंपिक मध्ये येणाऱ्या तसेच सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना सदर योजनेत स्थान मिळावे.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख युवक कार्यअध्यक्ष सागर तापकीर, युवा नेते ऍड संतोष शिंदे, युवक पदाधिकारी शाकीब शेख, वृशांत सोनवणे उपस्थित होते.
हे देखील वाचा: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक. | Pune Mumbai Road Block