Pune Mumbai द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक | Pune Mumbai Road Block

Yunus Khatib
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक. | Pune Mumbai Road Block

Pune Mumbai द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक. | Pune Mumbai Road Block

पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम (Highway Traffic Management System 2023) अंतर्गत मुंबई वाहिनीवर महामार्ग सुरक्षा विभाग केंद्र वडगाव हद्दीत कि. मी ७४/९०० व खंडाळा हद्दीत कि. मी ५६/९०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत दि ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार ) किवळे पुलावरून जुना Pune-Mumbai महामार्गावरून मुंबई दिशेला वळविण्यात येणार आहे.

पुणे ते मुंबई जुना महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोल नाका येथून एक्सप्रेस वेवर मुंबई दिशेने सोडण्यात येतील.

हे देखील वाचा: NCP च्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

Share This Article
3 Comments