आरक्षण आणि राज्यघटनेबाबत विरोधकांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्याचे काम करू’, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याबाबत संजय सोनवणे यांचं वक्तव्य.

PCC NEWS

आरक्षण आणि राज्यघटनेबाबत विरोधकांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्याचे काम करू’, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याबाबत संजय सोनवणे यांचं वक्तव्य.

बारामती दिनांक २५ ऑक्टोंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले, संजय सोनवणे समाजाच्या भल्यासाठी काम करत आहे मी त्यांना आश्वासन देतो की राष्ट्रवादी सर्वसमावेशक आहे, आणि मी आमच्या 10% जागा अल्पसंख्याकांना देईन. राज्याला पुढे नेण्यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या मार्गावर काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही पवार म्हणाले.

आंबेडकरी विचारांचा पक्ष अशी ओळख असलेला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सध्या राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत संजय सोनवणे म्हणाले की, संविधान बदलले जाईल आणि आरक्षण संपुष्टात येईल, या विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आम्ही प्रत्युत्तर देऊ इच्छितो. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देणार असल्याचे पक्षाने जाहीर केले.

पक्षाच्या पाठिंब्यामुळे इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची स्थिती आणखी भक्कम झाली आहे. संजय सोनवणे यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीला मोठ समर्थन मिळेल.

TAGGED:
Share This Article
Leave a comment