महाराष्ट्र शासनाच्या कामगार प्रतिनिधीपदी विजय भोसुरे व रामकृष्ण घावटे
आमदार महेश दादा लांडगे व कामगार नेते शिवाजी भाऊ पाटील यांच्या आशिर्वादाने मोठी जबाबदारी
पिंपरी-चिंचवड दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि माथाडी कामगार बांधवांना अभिमान वाटेल अशी आनंदवार्ता समोर आली आहे.
आमदार महेश दादा लांडगे आणि कामगार नेते आमदार शिवाजी भाऊ पाटील यांच्या आशिर्वादाने, तसेच सतत प्रामाणिकपणे केलेल्या सामाजिक-कार्यक्षेत्रातील योगदानाची दखल घेत, महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय भोसुरे व भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ पुण्याचे कायदेशीर सल्लागार श्री रामकृष्ण घावटे यांची कामगार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात आलेले नियुक्तीपत्र कामगार उप आयुक्त, पुणे – श्री. निखिल वाळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी त्यांनी दोघांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीनंतर व्यक्त झालेल्या भावना व्यक्त करताना विजय भोसुरे यांनी सांगितले की,
“आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीत प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची पावती मिळाली आहे.
“आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीत प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची पावती मिळाली आहे.
