
पिंपरी (प्रतिनिधी) :- ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवलं. त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता. तुम्ही माझ्या नाही, महाराष्ट्राच्या पाठीत वार केला. भरभरून आशिर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने अलिंगन दिले, तर आम्हीही देवू. पण, पाठीत वार केला, तर वाघनखाने पलटवार करू. जो महाराष्ट्राला नडेल, त्याला अशाच पध्दतीने महाराष्ट्र गाडेल, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली. तसेच, मोदीजी 4 जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल. पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
संजोग वाघेरेंना लोकसभेत पाठवा : उद्धव ठाकरे.Sign in to your account