पिंपरी चिंचवड महापालिकेतील महिला लिपीकानेच केल्या उपायुक्तांच्या बनावट सह्या.

PCC NEWS

पिंपरी चिंचवड महापालिकेतील महिला लिपीकानेच केल्या  उपायुक्तांच्या बनावट सह्या.

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) दिनांक: 26 जून 2024 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातून शहरातील वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांना परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. या परवाने व ना हरकत प्रमाणपत्रावर एका महिला लिपिकाने विभाग प्रमुख असलेल्या उपायुक्तांच्या बनावट सह्या करुन ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून शहरातील विविध लहान मोठ्या उद्योग, व्यवसाय यांना परवाने दिले जातात. या विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्या बनावट स्वाक्षरी करुन त्या लिपिक महिलेने कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांना ना हरकत दाखले दिले होते. त्या ना हरकत प्रमाणपत्रावरुन संबंधित व्यावसायिकांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे यापूर्वी पाठवलेल्या परवानगी प्रस्ताव आणि आता पाठवलेल्या प्रस्तावारील स्वक्षरीमध्ये फरक आढळून आला. त्यामुळे संशय आल्याने प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी ही बाब उपायुक्त संदीप खोत यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यानुसार चारही ना हरकत दाखल्यावरील स्वाक्षरी आपण केली नसल्याचे खोत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीत संबंधित लिपिक महिलेने बनावट स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. त्या महिला लिपिकाने उपायुक्त संदीप खोत यांच्यासमोर आपणच स्वाक्षरी केल्याची कबुली दिली आहे.

या संदर्भात उपायुक्त संदीप खोत म्हणाले, उद्योग, व्यावसाय परवान्याचे कामकाज करणाऱ्या लिपिकाने चार ना हरकत प्रमाणपत्रावर माझ्या खोट्या सह्या केल्या. या महिलेने याबाबत कबुली दिली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाला पत्र देवून संबंधित लिपिकावर योग्य ती कारवाई करावी असे कळवले आहे. तसेच या महिलेची तात्काळ बदली करण्यात आली आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment