मावळमधून ठाकरे गटाची संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर.
मावळ – महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला असून अधिकृरित्या संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद भूषविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. वाघेरे यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा आहे. 2014 पासून त्यांची तयारी सुरु होती. 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक लढविण्याची संधी हुकली. यावेळीही महायुतीत निवडणूक लढविण्याची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
रायगड दौ-यावर असताना उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली होती. तेव्हापासून वाघेरे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. आज अधिकृतरित्या वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वाघेरे यांची लढत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे. वाघेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आणि काँग्रेसची साथ मिळणार आहे.
मावळमधून ठाकरे गटाची संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर.मावळ – महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला असून अधिकृरित्या संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद भूषविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. वाघेरे यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा आहे. 2014 पासून त्यांची तयारी सुरु होती. 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक लढविण्याची संधी हुकली. यावेळीही महायुतीत निवडणूक लढविण्याची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.रायगड दौ-यावर असताना उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली होती. तेव्हापासून वाघेरे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. आज अधिकृतरित्या वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वाघेरे यांची लढत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे. वाघेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आणि काँग्रेसची साथ मिळणार आहे.