लाखो लोकांच्या साक्षीने सांगवीत ‘अहंकार’रुपी रावणाचे दहन. – शंकर जगताप – शहराध्यक्ष भाजप.

PCC NEWS

लाखो लोकांच्या साक्षीने सांगवीत ‘अहंकार’रुपी रावणाचे दहन. – शंकर जगताप – शहराध्यक्ष भाजप.

पिंपरी चिंचवड दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) सांगवी – लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने विजयादशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला महिलांसाठी महाभोंडला व रावणदहन सोहळा पिंपळे गुरव, सांगवी आणि पिंपरी चिंचवड शहरातील लाखो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषात संपन्न झाला. सुमारे १ लाखांहून अधिक नागरिकांच्या साक्षीने अहंकाराचे प्रतीक असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

सांगवी येथील पीडब्लूडी ग्राउंडवर शनिवारी (दि. १२ ऑक्टोबर) सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी माता आणि स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच उद्योगमहर्षी, पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांनाही आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाभोंडला कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शालिनीताई ग्रुप, परंपरा ग्रुप, अनुभूती ग्रुपच्या महिलांनी प्रथम गोंधळी नृत्यातून मंगळागौरीचा जागर केला. तर डोनेटेड सोसायटी ग्रुप, नवदुर्गा महिला मंडळ ग्रुप, राधाकृष्ण ग्रुप, वृंदावन ग्रुपच्या महिलांनी रासगरबा नृत्याचे सादरीकरण केले. तसेच मयूर डान्स अकॅडमीच्या मानसी भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केलेल्या ‘रामयणा’वर आधारित कथ्थक नृत्य तर ‘दम दमा दम’ या रिऍलिटी शोचे विजेते नृत्य कलाकार यांनी तानाजी मालुसरे यांच्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ थीमवर आधारित नृत्य सादर केले. यावेळी महाभोंडला कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला ग्रुपला आयोजकांच्या वतीने विशेष भेटवस्तू देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित लवकरच प्रदर्शित होत असलेल्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटात शंभूराजांची भूमिका साकारलेले कलाकार अनुप सिंग ठाकूर, चित्रपटाचे दिग्दर्शक दादा पाटील, आणि सहकलाकार श्रद्धा शिंदे यांनी विशेष हजेरी लावली. याप्रसंगी दाखविण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करून भरभरून दाद दिली.

त्याचबरोबर युट्युबवरील गाजलेल्या ‘चांडाळ चौकटीच्या करामती’ या वेबसिरीजचे कलाकार भरत शिंदे, रामभाऊ जगताप आणि सुभाष मदने यांनी सादर केलेल्या ‘ग्रामपंचायतीच्या ग्रामसभे’च्या विनोदी नाट्याने उपस्थितांचे पुरेपूर मनोरंजन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना शंकर जगताप म्हणाले की, आज या कार्यक्रमासाठी जमलेली गर्दी ही पिंपळे गुरव, सांगवी आणि पिंपरी चिंचवडकरांचे आमच्या जगताप कुटुंबावर तसेच सर्व कार्यकर्त्यांवर असलेल्या प्रेमाची खरी पोचपावती आहे. जे प्रेम आजपर्यंत तुम्ही स्व. लक्ष्मणभाऊंवर केले तेच प्रेम यापुढील काळात आम्हा सर्वांवर निरंतर राहू द्या. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, याची मी आपणास ग्वाही देतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. हेमंत हरहरे यांनी यावेळी सांगितले की, येणारी विधानसभा निवडणूक ही अधर्मी विरुद्ध निधर्मी अशी आहे. ही हिंदुत्वाची निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २८८ जागांवर हिंदुत्ववादी विचारसारणीच्याच उमेदवारांना निवडून आणत राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आपल्याला आणायचे आहे, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

दरम्यान, शंकर जगताप यांच्या हस्ते रिमोटच्या माध्यमातून ७० फुटी रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.

या कार्यक्रमाला विधानपरिषद आमदार सौ.उमाताई खापरे, श्री.अमित गोरखे, माजी महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे, मा उपमहापौर श्री.सचिन चिंचवडे, भाजपा निमंत्रित सदस्य सौ.भारतीताई विनोदे, श्री.संतोष कलाटे, मा.स्थायी समिती अध्यक्ष श्री.राजेंद्र राजापुरे, माजी सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेव ढाके, उद्योजक श्री.विजुशेठ जगताप, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.काळूराम नढे, आरपीआय नेत्या सौ.चंद्रकांताताई सोनकांबळे, मा.नगरसेवक श्री.विनायक गायकवाड, श्री.बाबासाहेब त्रिभुवन, श्री.शशिकांत कदम, श्री.संतोष कांबळे, श्री.हर्षल ढोरे, श्री.अंबरनाथ कांबळे, श्री.सागर आंघोळकर, सौ.आरतीताई चोंधे, सौ.निर्मलाताई कुटे, सौ.नीताताई पाडाळे, सौ.सविताताई खुळे, सौ.सुष्मा तनपुरे, सौ.उषाताई मुंढे, सौ.शारदाताई सोनावणे, सौ.वैशालीताई जवळकर, मा.स्वीकृत सदस्य श्री.विठ्ठल भोईर, श्री.विनोद तापकीर, श्री.महेश जगताप, श्री.गोपाळ माळेकर, श्री.संजय कणसे, श्री.सखाराम नखाते, मंडल अध्यक्ष श्री.प्रसाद कस्पटे, श्री.सोमनाथ भोंडवे, श्री.प्रकाश मीठभाकरे, श्री.जयनाथ काटे, श्री.नरेश खुळे, श्री.संजय भिसे, श्री.गणेश कस्पटे, श्री.शेखर चिंचवडे, श्री.नितीन इंगवले, श्री.राजाभाऊ चिंचवडे, श्री.हरिभाऊ चिंचवडे, श्री.बाबाजी तरस, श्री.राजू साळवे, श्री.विलास पाडाळे, श्री.विलास तात्या जगताप, श्री.दीपक भोंडवे, श्री.तानाजी भोंडवे, श्री.निलेश भोंडवे, श्री.दिलीप तनपुरे, श्री.गणेश नखाते, श्री.रणजीत कलाटे, श्री.नरेंद्र माने, श्री.सोमनाथ तापकीर, श्री.संतोष ढोरे, श्री.संकेत कुटे, श्री.कुणाल वाव्हळकर, श्री.गिरीश जाचक, श्री.देविदास तांबे, श्री.सचिन शिवले, श्री.सखाराम रेडेकर, श्री.गणेश ढोरे, श्री.गणेश बनकर, श्री.रमेश काशीद, नरेश जगताप, श्री.दीपक काशीद, श्री.संजय मराठे, श्री.अजय दुधभाते, भाजपा चिटणीस श्री.सागर फुगे, श्री.सिकंदर सूर्यवंशी, श्री.उमेश बोरसे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.कुंदाताई भिसे, सौ.कावेरी जगताप, सौ.उज्वलाताई गावडे, सौ.पल्लवीताई जगताप, सौ.मंदाकिनी तनपुरे, सौ.शोभाताई जांभूळकर, सौ.सारिका भंडलकर, सौ.पंचशीला दुधारे, सौ.स्वरूपा खापेकर, दुर्गाताई आदियाल, सौ.कोमलताई गौंडाडकर यांच्यासह सर्व भाजपा नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment