चिखली पोलीस स्टेशनचे Senior Inspector Salunkhe यांना सन्मानचिन्ह प्रदान; राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे विविध मान्यवरांचा गौरव
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्षा सौ. मनीषाताई गटकळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी अविरत कार्य करणारे विठ्ठलजी साळुंखे (Senior Inspector Salunkhe) यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेशजी बहल तसेच माजी शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात मा. महापौर सौ. मंगलाताई कदम, मा. नगरसेवक शामअण्णा लांडे, मा. नगरसेवक जितेंद्रजी ननावरे यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

- अतुल काळोखे – थरमॅक्स युनियन प्रतिनिधी
- सुमित कोंढे – थरमॅक्स युनियन प्रतिनिधी
- सुनील गाडे – मर्सिडीज बेंझ युनियन लीडर
- अर्चना बोरसुने – अध्यात्म व सामाजिक कार्य
- डॉ. रामश्याम अग्रवाल – वैद्यकीय व कोविड योद्धा
- दीपमाला नंदकुमार लोहकरे (हवालदार) – महिला सुरक्षा योगदान
कार्यक्रमात कृष्णा वाघ आणि मयुरेश वाघ निर्मित “स्वरधार” हा सदाबहार संगीत कार्यक्रमही पार पडला.
सेवा विकास बँक प्रकरणात खळबळ; सरकारी अधिकाऱ्यांची तीन तासांची धडक झाडाझडती!
विशेष उपस्थिती आणि सहकार्य
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. विशेषतः विशेष कार्यकारी अधिकारी शिवानंदजी चौगुले, यशवंत कण्हेर, सुनील गाडे, निर्भया नारी मंच, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच कुशाग्रदादा कदम, मारुती जाधव, अनिकेत बाबर, अक्षय इंगळे, अरुण चव्हाण, प्रशांत डमढेरे, युवराज बिराजदार, स्वप्नील शेंडगे यांसह अनेक मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
महिला पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष कविताताई खराडे, तसेच मेधाताई पळशीकर, आशाताई मराठे, ज्योतीताई गोफने यांसह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
याशिवाय सर्जेराव ढेकणे, प्रकाश कांबळे, भरत गोडगे, रमेश भांडवलकर, भुजंगराव मस्कर, बळीराम गटकळ, विकास गोरे, आणि विविध सामाजिक संस्था व महिला गटांची उपस्थिती लक्षणीय होती.
मनीषाताई गटकळ यांची भावनिक विनंती
गेल्या 21 वर्षांपासून पक्षाची विचारधारा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविताना विविध पदांवर यशस्वी कामगिरी केलेल्या सौ. मनीषाताई गटकळ यांनी “जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मनपा सभागृहात कार्य करण्याची संधी मिळावी. आपण सर्वांचे प्रेम व आशीर्वाद सदैव सोबत राहो,” अशी मनोगतातून विनंती केली.
कार्यक्रमाचे आयोजन श्री जयंत किसन गटकळ व डॉ. तन्मय बळीराम गटकळ यांनी केले. आभार प्रदर्शन श्री बळीराम कल्याणराव गटकळ यांनी मानले.
