सायली नढे पुन्हा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा

PCC NEWS
1 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

सायली नढे पुन्हा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, पक्षाच्या विश्वासाला साजेसे नेतृत्व देण्याचा निर्धार

पिंपरी-चिंचवड दिनांक : १८ ऑक्टोंबर २०२५ (युनूस खतीब) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा पदावर सायली नढे यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा आणि मार्गदर्शिका संध्या सव्वालाखे यांनी नढे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.

गत कार्यकाळात सायली नढे यांनी महिला काँग्रेस संघटनाला नवसंजीवनी देत शहरातील विविध सामाजिक व नागरी प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण असो वा नागरिकांच्या पाणीप्रश्नावर केलेले उपोषण — नढे यांनी महिला नेतृत्वाची ठाम छाप पाडली होती.

पक्षाच्या आव्हानात्मक काळातही त्यांनी काँग्रेसशी निष्ठा राखत संघटन उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या याच सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत पक्षाने पुन्हा त्यांच्या खांद्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सायली नढे म्हणाल्या, “अलकाजी लांबा आणि संध्याताई सव्वालाखे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी प्रेरणादायी बाब आहे. पिंपरी-चिंचवडमधील महिलांचे सक्षमीकरण आणि काँग्रेस विचारधारेचा प्रसार हेच माझे ध्येय राहील.”

नढे यांच्या फेरनिवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, शहरातील महिला काँग्रेस नव्या ऊर्जेसह कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Share This Article
Leave a comment