महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील जमा होणाऱ्या रक्कमेवर कर्मचारी, अधिकाऱ्यांचा दरोडा.
– महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील भ्रष्टाचार उघड.
– दोन महिन्यात ९ लाख ७६ हजार केले हडप.
पिंपरी दिनांक ०३ जुलै २०२४ (प्रतिनिधी) – महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात रोजच्या रोज जमा होणाऱ्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ०१ मार्च २०२४ ते ३० एप्रिल २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत ९ लाख ७६ हजारांचा ६९१ रुपयांची रक्कम जिजामाता रुग्णालय व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी हडप केली आहे. असा आरोप काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांनी मंगळवारी (दि. २) पत्रकार परिषदेत केला. ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली असल्याचे नढे यांनी सांगितले.
त्यावेळी माजी नगरसेविका निगार बारस्कर, माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, परिवहन विभाग प्रदेश उपाध्यक्षा स्वाती शिंदे, डॉक्टर सेलच्या शहराध्यक्षा डॉ. मनीषा गरुड, किरण नढे आदी उपस्थित होते.
नढे म्हणाल्या की, जिजामाता रुग्णालयात रोजच्या रोज जमा करण्यात येणाऱ्या रक्कमेच्या भरणार रजिस्टरमध्ये अफरातफर झाली आहे. रोजच्या रोज जमा होणारी भरणा रक्कम बँकेत न भरता तिचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर अधिकाऱ्यांनी केला आहे. रुग्णांकडून जमा होणारी रक्कम रोजच्या रोज न भरता नंतरच्या तारखेला भरण्यात आली. १ मार्च ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये एकूण रक्कम १८ लाख ६६ हजार ३५६ रुपये इतकी झालेली आहे. त्यामधील फक्त ८ लाख ८९ हजार ६६५ रुपये इतकी रक्कम बँकेत भरण्यात आली आहे. उर्वरित रक्कम रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी मिळून या रकमेचा भ्रष्टाचार केला आहे.
भरणा रक्कम ही रोजच्या रोज भरण्यात येते, ही रक्कम जमा करण्याकरता बँक ऑफ बडोदा या बँकेतील कर्मचारी रोजच्या रोज हॉस्पिटलमध्ये येऊन भरणा रक्कम घेऊन जातात. मात्र, जिजामाता रुग्णालयातील भरणा रक्कम रोजच्या रोज जमा होत नसताना बँकेचे अधिकाऱ्यांनी भरणा रजिस्टरवर बँकेचे शिक्के मारलेले आहेत. तसेच रोजच्या रोज ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी रुग्णालयामध्ये उपस्थित असताना रजिस्टर व बँक चलनावरती दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या उपलब्ध आहेत. यामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेन होतवानी रुग्णालयामध्ये अनुपस्थित असताना त्यांच्या सह्या भरणा रजिस्टर व बँक चलनावरती उपलब्ध आहे. त्यामुळे यावरून स्पष्ट होतं की आरोग्य वैद्यकीय अधिकारी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, लिपिक, बँक अधिकारी तसेच वैद्यकीय विभाग, लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगममताने महापालिकेच्या पैशाची मोठी अफरातफर केली आहे. अशी माहिती नढे यांनी यावेळी दिली.
संशयास्पद मुद्दे.
(०१) ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवी व वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बांगर हे या कालावधीत रुग्णालयामध्ये हजर असताना त्यांनी गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेन होतवानी यांच्या नावाच्या सह्या कोणी केल्या किंवा त्यांना त्या कागदपत्रावरती सह्या कोणी करायला लावल्या?
(०२) ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवी व वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बांगर या अधिकारी या कालावधीमध्ये उपस्थित असताना डॉ. विकल्प भोई यांना भरणार रजिस्टरवर सह्या का करायला लावल्या ?
(०३) रुग्णालयामध्ये जमा होणाऱ्या रकमेच्या भरणा रोजच्या रोज बँकेत भरला जात नसताना त्या भरणा रजिस्टरवर व भरणा बँक चलनावरती गैरहजर वैद्यकीय अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून सह्या करत होता.
(०४) एवढे दिवस हा भ्रष्टाचार चालू असताना रुग्णालयातील प्रमुख ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी महापालिका आयुक्त यांना का कळवलं नाही.
(०५) जिजामाता रुग्णालयामध्ये रोजच्या रोज होणाऱ्या भरणा रक्कम जमा करण्यासाठी बँक कर्मचारी रोज येत असतात पण रोजच्या रोज जमा होणारी रक्कम रुग्णालय लिपिक आकाश गोसावी यांनी भरली नसताना बँक कर्मचाऱ्यांनी आयुक्त साहेब किंवा आरोग्य वैद्यकीय विभाग यांना का कळवलं नाही.
(०६) दिनांक १४ जून २४ रोजी जिजामाता रुग्णालय पिंपरी येथील रुग्णालयामधील माहिती माहिती अधिकारांमध्ये टाकली होती व ती घेण्यासाठी माझे पती श्री किरण बाबाजी नढे हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले. यावेळी श्री किरण नढे यांच्या समोर रुग्णालयाचे अधिकारी नीलकंठ कांची साहेब यांनी रुग्णालय कर्मचारी लिपिक आकाश गोसावी यांना माहिती मागितली असता त्याने आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांचं नाव घेऊन माहिती न देण्यास सांगितला आहे, असं बोला.

जिजामाता रुग्णालयात अगोदर घडलेले भ्रष्टाचाराचे प्रकरण.
(०१) जिजामाता रुग्णालयात मानधनावर कर्मचाऱ्यांची बिले आता करताना कार्यात नसलेल्या कर्मचाऱ्यांचे नावे मानधनाची बिल काढून सप्टेंबर २०२० ते मार्च २०२३ अखेरपर्यंत विशेष लेखा परीक्षण अहवालानुसार २० लाख ७४६०० रुपये एवढ्या रकमेचा आर्थिक अपहार आरोग्य वैद्यकीय अधिकारी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी केला.
(०२) सिस्टर इन्चार्ज किरण अविनाश गायकवाड यांनी औषधाचा साठा रुग्णालयाच्या मेडिकल मध्ये न ठेवता वैयक्तिक लॉकरमध्ये ठेवून त्याची परस्पर बाहेर विक्री करत होत्या याची चर्चा रुग्णालयामध्ये झाल्यानंतर १० एप्रिल २०२३ रोजी जेष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी एमआयसीयू ची तपासणी केली असता ९० हजार रुपयांचे इंजेक्शन त्यांच्या वैयक्तिक लॉकरमध्ये आढळून आल्या याबाबत ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किरण गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
(०३) जिजामाता रुग्णालय पिंपरी येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण श्वेता अश्विन यादव या महिलेचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया.
सदर प्रकरणात महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय विभागाचे प्रमुख आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिता साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ जितेन होतवानी,वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली बांगर, डॉ विकल्प भोई, लिपिक आकाश गोसावी या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे त्यामुळे या सर्वांचं निलंबन करून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमवून जिजामाता हॉस्पिटल व इतर सर्व हॉस्पिटलचे ऑडिट करण्यात यावे ही विनंती.