निवृत्त आरोग्य निरीक्षक नवनाथ मस्के आम आदमी पार्टीत शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या हस्ते उपाध्यक्षपदी नियुक्ती

PCC NEWS
2 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1,"effects":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

निवृत्त आरोग्य निरीक्षक नवनाथ मस्के आम आदमी पार्टीत

शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या हस्ते उपाध्यक्षपदी नियुक्ती

पिंपरी-चिंचवड, दि: २४ ऑक्टोबर २०२५ (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त सहाय्यक आरोग्य निरीक्षक नवनाथ दशरथ मस्के यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला असून, पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या हस्ते त्यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहरात संघटन बळकटीसाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीसाठी जोमाने कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर झालेला नवनाथ मस्के यांचा पक्षप्रवेश हा पक्षासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या प्रसंगी पक्षाचे कामगार आघाडीचे उपाध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात मस्के यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात नवनाथ मस्के यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य निरीक्षक म्हणून कार्य केले असून, ते भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर उपाध्यक्ष राहिले आहेत. विविध सामाजिक, आरोग्य आणि जनजागृती उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

या वेळी बोलताना शहराध्यक्ष रविराज काळे म्हणाले, “नवनाथजी मस्के यांच्या रूपाने आम आदमी पार्टीला एक लोकसंग्रही आणि अनुभवी नेतृत्व लाभले आहे. ते पक्षाचे विचार पिंपरी-चिंचवडच्या जनतेपर्यंत पोहोचवतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

आपल्या नियुक्तीनंतर मस्के म्हणाले, “पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास मी जनतेच्या सेवेद्वारे सार्थ ठरवीन. आम आदमी पार्टीला शहरात मजबूत करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीन.”

नवनाथ मस्के यांचा पक्षप्रवेश आणि नियुक्ती ही आम आदमी पार्टीच्या संघटनात्मक वाढीसाठी निर्णायक पाऊल ठरू शकते, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Share This Article
Leave a comment