पुणे, येरवडा येथे होणाऱ्या गोर बंजारा समाजाच्या महा मोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – मा.विजय भाऊ पवार (जिल्हाध्यक्ष, गोर सेना पुणे)

PCC NEWS

पुणे, येरवडा येथे होणाऱ्या गोर बंजारा समाजाच्या महा मोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – मा.विजय भाऊ पवार ( जिल्हाध्यक्ष, गोर सेना पुणे )

पुणे दिनांक: 3 फेब्रुवारी 2025 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) तमाम भारतातील गोर बंजारा समाजबांधवाना कळविण्यात येत आहे की, क्रांतिकारी सतग‌रु सेवालाल महाराज हे भारतातील 14 कोटी गोर बंजारा समाजासह विमुक्त जातीचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान आहे.

त्यांच्या समाजप्रबोधनाचे प्रेरणादायी कार्ये तमाम भटक्या विमुक्त समाजला उर्जा निर्माण करणारे आहे. त्यांच्या भव्यदिव्य कार्याचे वर्णन बंजारा लोकगीतातून ” धोळी लगीरी शितळ छाया वोम बेटो भाया, हुबी दनिया अरजी करछ नेम किदो भाया,तलवारेर गंज पडीच बोल मरियामा माया,सेवाभाया युं कर बोलो लाढायीन जाया… अशाप्रकारे प्रकर्षाने जाणवते त्यांच्या क्रांतीद‌र्शी कार्यामुळे व समतावादी विचारसरणीमूळे ते भारतभर लोकप्रिय झाले.

त्यामुळेच पुण्यातील येरवडा चौकातील चिम्मा गार्डनमध्ये क्रांतीकारी सतगरु सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्याचे भव्यदिव्य बांधकाम व्हावे अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र मधील समाज बांधवांकडून व गोर सेना या सामाजिक संघटनेकडून स्थानिक शासन व प्रशासनाला केली आहे.

गोर बंजारा समाजाच्या सद्‌भावना लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधीनी आर्थिक सहकार्य केले तसेच लोकवर्गणीतून पुतळा उभारणीसाठी  निधी गोळा करुन बांधकामाला रितसर सुरुवात केली..

मात्र काही विघ्न संतोषी समाजकंटकाकडून क्रांतिकार सतगरु सेवालाल महाराज यांच्या पुतळा व चौथाराच्या बांधका‌मास अडथळा आणून  चौथर्यापर्यन्त आलेल्या बांधकामाला अडवून ठेवले आहे संपूर्ण महाराष्ट्र मधील गोरबंजारा समाज बांधवांकडून व गोर सेना या सामाजिक संघटनेच्या पुढाकारातून या पुतळ्याची निर्मिती होत असल्याने पोटसूळ उठलेल्या समाजकंटकाकडून जाणीवपूर्वक विरोध करण्यात येत आहे.

सदर पुतळ्याचे काम शासन प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने होत असून कुठल्याही खुल्या जागेत, वाहतूकीला अडथळा होईल असा ठिकाणी सदर बांधकाम नसून  बंदिस्त अशा चिम्मा गार्डनमध्ये उभारण्यात येत आहे म्हणूनच शासन प्रशासनाने मान्यता दिली आहे त्यासाठी लागणाऱ्या चौथर्याच्या बांधकामा‌साठी रितसर परवानगीसुद्धा दिलेली आहे. मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी सदर पुतळा  पुर्णत्वास जावू न देण्याचा जणू विढाच उचललेला आहे व जातीय तेढ निर्माण करण्याचे अघोरी कृत्य सुरू केले आहे.

तेव्हा अशा समाजकंटकांच्या भिकेला हाक न देता येरवडा चौक चिम्मा गार्डन येथे क्रांतिकारी सतगरु सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी एक शासकीय बैठक लावावी व भारतातील 14 करोड भटक्या विमुक्त समाजाच्या जनभावनेचा आदर करून अश्वारूढ पुतळ्याचे व चौथऱ्याचे बांधकाम लवकर सुरु करण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून गोर बंजारा समाजाच्या वतीने, आदरणीय मा.प्रा.संदेश भाऊ चव्हाण,गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील चिम्मा गार्डन येरवडा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथ पर्यंत दि.10 फेब्रुवारी २०२५ वार सोमवार रोजी जन आंदोलन सद्भावना महा रॅलीचे भव्य असा लाखोंच्या संख्येमध्ये आयोजन करण्यात आले असून या जन आंदोलनाची व महा रॅलीची सुरुवात चिम्मा गार्डन येथून सकाळी १०.०० वाजता होत आहे तरी तमाम भारतीय गोरबंजारा व भटक्याविमुक्तानी या महारॅलीत लाखोंच्या संख्येने सहभाग घेवून जन आंदोलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे सर्व गोर समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे .

TAGGED:
Share This Article
Leave a comment