पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे निषेध.

PCC NEWS

पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे निषेध. 

संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे. 

युनूस खतीब 9420554065

पिंपरी-चिंचवड दिनांक :१२ फेब्रुवारी२०२४ ( प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे पुण्यात ” निर्भय बनो ” कार्यक्रमास आले असता त्यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला करण्यात आला या घटनेचा पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ जाहीर निषेध करीत असून याबाबतचे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येणार आहे.

प्रसिद्ध वकील ऍड.असीम सरोदे,थोर समाजसेवक विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे पुण्यातील ” निर्भय बनो ” या कार्यक्रमासाठी आले असता भाजपच्या गुंडांनी त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉड ने ही हल्ला करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्य केले आहे.

या कृत्याचा पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ निषेध करीत असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन करीत असल्याचे अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक बापूसाहेब गोरे,पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव,पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मिडिया अध्यक्ष भिमराव तुरुकमारे यांनी सांगितले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment