भरत वाल्हेकरांसोबत पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी चिंचवड विधानसभेवर ठोकला दावा.

PCC NEWS

भरत वाल्हेकरांसोबत पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी चिंचवड विधानसभेवर ठोकला दावा.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चिंचवड विधासभेवर दावेदारी

भरत वाल्हेकरांसोबत पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी चिंचवड विधानसभेवर ठोकला दावा, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेवट्टीवर यांना दिले निवेदन

चिंचवड विधानसभा काँग्रेसनेच लढवावी वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस नेत्यांना निवेदन.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चिंचवड विधानसभा हा मतदारसंघ काँग्रेसनेच लढवावा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पराभव होऊ शकतो असे निवेदन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर व त्यांच्यासोबत गेलेल्या पिंपरी चिंचवड मधील काँग्रेसचे पदाधिकारी यांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेवट्टीवर यांना दिले. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉल येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीच्या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांना चिंचवड विधानसभा ही आपण जर लढवली तर कशी जिंकू या संदर्भात प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवला. सन २००९ साली , व २०१४ साली चिंचवड विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार दिले होते व त्यानंतर २०१९ साली महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. त्यानंतर आलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने उमेदवार दिला होता परंतु खूप मोठ्या फरकाने सदर उमेदवाराचा पराभव झाला होता. सध्याची परिस्थिती पाहता आघाडीतील इतर पक्षाच्या तुलनेने काँग्रेस पक्षाची ताकद चिंचवड विधानसभा मतदारसंघात जास्त आहे आणि भारतीय जनता पार्टीची एकूण महाराष्ट्रात झालेली पीछेहाट , घटलेला मतदानाचा टक्का त्याचप्रमाणे चिंचवड विधानसभेमध्ये भरत वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली इंदिरामाई स्वस्थ थाळी योजना, स्किल इंडिया अंतर्गत शिवण क्लास , कम्प्युटर क्लास, आठवडे बाजार, पाणपोई , वाचनालय या सारखे अनेक उपक्रम चिंचवड विधानसभेत राबवले गेले आहेत. या सर्वांचा फायदा आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला होईल.
मतदार संघ बांधणीच्या संदर्भात नाना पटोलेंनी केलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर भरत वाल्हेकर यांनी सांगितले की आपण एक वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात बूथ कमिटी लेवल बांधणी करण्यास सांगितली होती, त्याप्रमाणे चिंचवड विधानसभेतील ६५० बुथ वर पूर्णपणे काम झालेले असून बुथ अध्यक्ष , बूथ लेवल एजंट , बुथ पदाधिकाऱ्यांची लिस्ट आपणाकडे सादर करून त्याचप्रमाणे लवकरात लवकर चिंचवड विधानसभेमध्ये पाच ते सहा ठिकाणी पक्ष कार्यालय उभारणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये प्रत्येक वॉर्ड निहाय शाखा उभारण्यासाठी आमचे काम चालू असून आपण उद्घाटनाची तारीख द्यावी असे भरत वाल्हेकर यांनी नाना पटोले यांना सांगितले.

या सर्व गोष्टींचा विचार करता आपली चिंचवड विधानसभा मोठ्या मताधिक्याने जिंकू असे, वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, माजी चिंचवड ब्लॉक अध्यक्ष संदेश नवले , माजी प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी संघटना मनोज कांबळे, पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस निखिल भोईर, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष विजय ओव्हाळ, पिंपरी चिंचवड सचिव संदीप शिंदे, सचिव सुधाकर कुंभार, सरचिटणीस युनुस बागवान या सर्वांनी मिळून नाना पटोले, बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेवट्टीवर यांना सांगितले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment