महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्विकारला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार

PCC NEWS
1 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्विकारला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार

मेट्रोने प्रवास करत महापालिकेत दाखल होऊन दिला सार्वजनिक वाहतूकीचा प्रतीकात्मक संदेश

पिंपरी, १० ऑक्टोबर २०२५ : (युनूस खतीब) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनी ‘महा-मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे, त्यांनी या निमित्ताने मेट्रोने महापालिकेत प्रवेश करत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास दाखवून दिला.

महापालिकेचे मावळते आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नुकतीच झाली आहे. सिंह यांच्या जागी हर्डीकर यांना महापालिका आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आज महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हर्डीकर यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येऊन हा पदभार स्वीकारला.

आयुक्त हर्डीकर यांनी महापालिकेत आल्यानंतर सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार माजी खासदार, नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Share This Article
Leave a comment