चिंचवड गावात शनिवार दि. ८ नोव्हेंबर रोजी भव्य मोफत नोकरी अभियान,
युवा नेते सचिन दोनगहू आणि लाईट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
पिंपरी चिंचवड दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ (pccnews in) बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी युवा नेते व प्रतिष्ठित उद्योजक मा. सचिन अरुण दोनगहू (कार्याध्यक्ष – पिंपरी चिंचवड शहर शिवशाही व्यापारी संघ) आणि लाईट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य मोफत नोकरी अभियान आयोजित करण्यात आले आहे.
हे अभियान शनिवार दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ४ वाजेपर्यंत पार पडणार असून, स्थळ – चैतन्य सभागृह, पवना नगर, बिजली नगर रोड, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल समोर, चिंचवड गाव असे आहे.
या उपक्रमात उपस्थित सर्व उमेदवारांसाठी नाश्ता आणि चहाची विशेष सोय करण्यात आली आहे.
या रोजगार अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे — उमेदवारांना थेट नामवंत कंपन्यांच्या PAYROLL वर नोकरीची संधी मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्टर अथवा मध्यस्थ नसून उमेदवारांची थेट कंपनीसोबतच निवड प्रक्रिया होणार आहे.
या अभियानात BFSI, टेली कॉलिंग, मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स, ऑफिस असिस्टंट, बँक स्टाफ, रिटेल इंडस्ट्री (झुडिओ, डीमार्ट), कॅफे कॉफी डे, स्टारबक कॅफे, मुव्ही थिएटर, सेल्स एक्झिक्युटीव्ह, सिक्युरिटी गार्ड, हाऊसकीपिंग, गॅरेज आदी विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत.
युवा नेते मा. सचिन दोनगहू, शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य आणि वेताळ बुवा प्रतिष्ठान यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या मोफत रोजगार अभियानाचा लाभ घ्यावा आणि उत्तम करिअरकडे वाटचाल करावी.
उमेदवारांनी दिलेल्या QR CODE द्वारे ऑनलाइन नोंदणी करून स्वतःचा रिज्युम (BIO-DATA) अपलोड करावा आणि ठरलेल्या दिवशी अभियान स्थळी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
सचिन भाऊ – 7720027837
सोनाली मॅडम – 9011353780
प्रतीक सर – 7507516415
सुदर्शन सर – 9561984147
विजय भाऊ – 7887508593
सचिन भाऊ – 7720027837
सोनाली मॅडम – 9011353780
प्रतीक सर – 7507516415
सुदर्शन सर – 9561984147
विजय भाऊ – 7887508593

