काँग्रेस नेते मनोज शुक्ला यांच्या विरोधात कारवाईची मागणी.

PCC NEWS
2 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

काँग्रेस नेते मनोज शुक्ला यांच्या विरोधात कारवाईची मागणी.

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांचे काँग्रेस उच्च नेतृत्वाला पत्र.

पिंपरी चिंचवड दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 (अपडेट बाय युनूस खतीब) मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते मनोज शुक्ला यांनी भाजपा-आरएसएसच्या प्रचाराला चालना दिल्याचा आरोप करत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन एम. शेख यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार इमरान प्रतापगढी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात मनोज शुक्ला यांच्यावर तातडीने पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेख यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, भोपाल येथील नरेला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी उमेदवार मनोज शुक्ला हे सध्या भाजपा आणि आरएसएसच्या प्रचाराला समर्थन देत आहेत. हा प्रकार काँग्रेस पक्षाच्या विचारसरणी आणि मूल्यांविरोधात असून, त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेख यांच्या मते, 2023 च्या विधानसभा निवडणुकीत मनोज शुक्ला यांना एकूण 99,983 मते मिळाली होती, ज्यांपैकी सुमारे 70 हजार मते मुस्लिम मतदारांची होती. त्यामुळे या समुदायामध्ये काँग्रेसबद्दल प्रचंड विश्वास आहे. मात्र, अशा वर्तनामुळे अल्पसंख्यक समाजाची भावना दुखावली जात आहे, असे शेख यांनी नमूद केले आहे.

शेख यांनी पुढे लिहिले आहे की, “सांसद राहुल गांधी यांनी स्वतः म्हटले आहे की काँग्रेसमध्ये आरएसएस विचारांचे लोक शिरले आहेत आणि ते पक्षाला आतून कमजोर करत आहेत. मनोज शुक्ला यांचे वर्तन त्याचाच पुरावा आहे.”

त्यामुळे मनोज शुक्ला यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षाची एकता आणि अल्पसंख्यक समाजाचा विश्वास अबाधित राहील, असे शेख यांनी स्पष्ट केले आहे.

या निवेदनावर शहाबुद्दीन एम. शेख, अध्यक्ष – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यक विभाग) यांनी स्वाक्षरी केली असून, प्रत मल्लिकार्जुन खर्गे व इमरान प्रतापगढी यांना पाठवण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment