लोकशाहीच्या उत्सवात सहभागी सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार – निखिल दळवी

PCC NEWS
1 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार – निखिल दळवी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ शांततेत, शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात पार पडल्याबद्दल प्रभाग क्रमांक १४ (अ) मधील सर्व मतदार बांधव-भगिनींचे शिवसेना उपशहरप्रमुख व युवासेना पिंपरी-चिंचवड शहर संस्थापक/अध्यक्ष, विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल उमाकांत दळवी यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

लोकशाहीची मूल्ये जपत मतदान प्रक्रियेत सजग सहभाग नोंदविणाऱ्या नागरिकांमुळे लोकशाही अधिक मजबूत झाल्याचे दळवी यांनी सांगितले. तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या निवडणूक प्रशासन, अधिकारी-कर्मचारी वर्ग व पोलिस यंत्रणेचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.

या निवडणूक प्रवासात विश्वासाने साथ देणारे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे प्रतिनिधी, हितचिंतक व नागरिक यांचेही दळवी यांनी मनापासून आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळे लोकशाही प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी व प्रेरणा असून, सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक विकास, समतोल प्रगती व लोकहितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा ठाम संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment