पिंपरीकरांना प्रत्यक्ष अनुभवता येणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीटचा नजराणा
Share
2 Min Read
PccnewsPccnews
SHARE
पिंपरीकरांना प्रत्यक्ष अनुभवता येणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीटचा नजराणा
पिंपरी (प्रतिनिधी) : डी. जे. अम्युजमेंटच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट या संकल्पनेवर आधारित भव्य एक्झीबीशनचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना सादर करणाऱ्या डी. जे. अम्युजमेंटने यावर्षी पिंपरीकरांसाठी एक आगळीवेगळी “युरोपियन नगरी” उभी केली असून, यामध्ये लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीटचे हुबेहूब दर्शन घडणार आहे.
नेहरू नगर येथील एच. ए. मैदान, पिंपरी (४११०१८) येथे हे प्रदर्शन शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ पासून दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल १८० फूट लांबीचा, ४५ फूट उंच आणि १५ फूट रुंदीचा लंडन ब्रिज, ज्यावरून चालण्याचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाईसह युरोपियन सिटीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
या ठिकाणी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांसाठी मनोरंजनाची साधने उपलब्ध असून, जायंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, ब्रेक डान्स, मोठा पाळणा अशा विविध राइड्सचा आनंद घेता येणार आहे. मुलांसाठी पेडल बोट, जंपिंग, मिनी ट्रेन यांसारख्या खास राइड्सची सोय करण्यात आली आहे.
प्रदर्शनात घरगुती वस्तू, क्रीडा साहित्य, कूलिंग भांडी, मुलांची खेळणी, तयार कपडे, तसेच पुस्तकांचे स्वतंत्र स्टॉल असून सवलतीच्या दरात खरेदीची संधी उपलब्ध आहे. याशिवाय पाणीपुरी, चाट, उटी चिल्ली बज्जी, सोलापुरी पदार्थ, पॉपकॉर्न, कॉटन कँडी, आईस्क्रीम, चिल्ली गोबी, मिरची भजी यांसारख्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. आकर्षक सेल्फी पॉइंट्सही येथे उभारण्यात आले आहेत.
या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राहुल (दादा) भोसले व श्री. समीर (दादा) मासुळकर (माजी नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महापालिका) उपस्थित राहणार आहेत.
ही माहिती पत्रकार परिषदेत सुदेश कुमार (मॅनेजर), जयराज, रवी नायर आणि संतोष जाधव यांनी दिली. पिंपरीमध्ये प्रथमच साकारलेल्या या लंडन ब्रिज व युरोपियन स्ट्रीट प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवडकरांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजक डी. जे. अम्युजमेंट यांच्याकडून करण्यात आले आहे.