मदतीशिवाय शाळेच्या काया पालटची तयारी
माजी विद्यार्थी उभारणार क्रीडा संकुल व आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा
पिंपरी चिंचवड आजची पिढी अभ्यासात हुशार आहे, हे मान्य.पण हातात मोबाईल आला की बुद्धीला सुट्टी आणि अंगाला निवृत्ती! डोळे स्क्रीनवर, मान खाली, आणि मन कुठेतरी “नेटवर्क शोधत” फिरत असते. पालक विचारतात – “मुलं बाहेर का जात नाहीत?” आणि मुलं उत्तर देतात – “बाहेर नेटवर्क नाही!” याच प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे गॅझेट फ्री अकॅडमी.
ज्या शाळेच्या आवारात आम्ही हा प्रकल्प सुरू केला त्याच महानगरपालिकेच्या शाळेचे आम्ही माजी विद्यार्थी असून, ज्या शाळेने आम्हाला घडवले मोठे केले त्याच शाळेबद्दल आपले काही उत्तरदायित्व समजून आमची शाळा स्वच्छ सुंदर, चांगली राहावी आणि चांगले उपक्रम राबविण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही याच ठिकाणी या अकॅडमीची सुरुवात केली, व यशस्वी वाटचाल अविरतपणे सुरू आहे. या सहा वर्षात आमच्या स्वतःच्या दोन फुटबॉल टीम, मुलींची क्रिकेट टीम, कबड्डी व खो-खो यांचे प्रशिक्षण वर्ग यांच्या माध्यमातून नियमित व्यायाम घेणे त्यांच्याकडून सराव करून घेणे हे सातत्याने चालू आहे.
गॅझेट फ्रि हावर्स अकॅडमीचे राकेश गायकवाड, मायल्या मामा खत्री, महेश देशपांडे, राजू पावले, प्रवीण जाधव,नीलेश खोल्लम, डॉमन्यूक स्पॅम्यूएल, नेल्सन सॅम्युएल, शैलेंद्र भावसार, रियाज इनामदार, बाळासाहेब कलापूरे, आशिष जाधव, अभय सांगळे, सागर गोरे, अमित काटे, अब्दूल मूल्ला, योगेश खोल्लम, नाज़िम शेख,डॉ. सूशिलकुमार शिंदे, मंगेश येरुंकर, गणेश शेलार, अलोसिस इग्नेसिस, सुरेश पाटील, अनिल भोसले, नितिन भावसार, प्रशांत खत्री आदींनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
ज्या महापालिकेच्या शाळेने आम्हाला घडवलं… आज तीच शाळा बदलायची जबाबदारी माजी विद्यार्थ्यांनी घेतली आहे! सरकारची वाट न पाहता, स्वखर्चाने, स्वश्रमातून शाळेचा कायापालट सुरू आहे.याबद्दल सविस्तर निवेदन सौ.संगीता घोडेकर प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना देण्यात आले.मोबाईल आणि सोशल मीडियात अडकलेल्या मुलांना मैदानाकडे वळवण्यासाठी गॅझेट फ्री अकॅडमीची सुरुवात झाली.आज फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो… २०० पेक्षा जास्त कुटुंबांचा विश्वास या उपक्रमासोबत आहे.आता पुढचं स्वप्न मोठं आहे — सुसज्ज क्रीडासंकुलआणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा!अभ्यास, कौशल्य, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकास…सगळं एका छताखाली.
ही फक्त शाळेची गोष्ट नाही…ही आहे ऋण फेडणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची कहाणी!
ही फक्त शाळेची गोष्ट नाही…ही आहे ऋण फेडणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची कहाणी!

