वाहतूक कोंडीला अखेर आराम! वाकड–मामुर्डी सेवा रस्त्यांच्या कामाला सुरूवात — आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश.

PCC NEWS
2 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

वाहतूक कोंडीला अखेर आराम!

वाकड–मामुर्डी सेवा रस्त्यांच्या कामाला सुरूवात – आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश.

वाकड, ७ ऑक्टोबर २०२५ (अपडेट बाय युनूस खतीब)
वाकड ते मामुर्डी दरम्यान वाहतुकीला सुलभता आणणाऱ्या सेवा रस्त्यांच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या कामासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दिलास्याचे वातावरण आहे.

कामाच्या प्रारंभीच अतिक्रमण हटविणे, डांबरीकरण, सेवा लाईन शिफ्ट करणे आणि वाहतूक मार्ग मोकळा करणे अशी प्राथमिक पावले उचलली जात आहेत. यासोबतच रस्त्यांच्या कडेला लावलेली होर्डिंग्ज, कंटेनर आणि झाडे यामुळे निर्माण होणारे अडथळे दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), वाहतूक विभाग आणि महावितरण या सर्व यंत्रणांचा संयोजित समन्वय साधत कामाची गती वाढवण्यात आली आहे.

आमदार शंकर जगताप यांनी काही दिवसांपूर्वी या परिसराचा पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतरच आज प्रत्यक्ष कामाला गती मिळाल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे.

आमदार जगताप म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सेवा रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. ही कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

दरम्यान, भुजबळ चौक ते भूमकर चौकापर्यंतचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून उर्वरित भागात जलदगतीने काम सुरू आहे. लवकरच हा मार्ग पूर्णपणे तयार होऊन नागरिकांना सुरळीत आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment