महापालिका भवनात पत्रकारांसाठी स्पष्ट नियमावली तयार करा; ओळखपत्र देण्याची मागणी – सुलभा उबाळे
पिंपरी चिंचवड सिटी न्यूज
Share
1 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजPccnews
SHARE
महापालिका भवनात पत्रकारांसाठी स्पष्ट नियमावली तयार करा; ओळखपत्र देण्याची मागणी – सुलभा उबाळे
पिंपरी चिंचवड दिनांक २८ (युनूस खतीब) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनात येणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व स्पष्ट नियमावली तयार करण्यात यावी, तसेच महापालिकेच्या वतीने पत्रकारांना अधिकृत ओळखपत्र (आयकार्ड) देण्यात यावे, अशी ठाम मागणी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली आहे.
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे मत उबाळे यांनी व्यक्त केले. महापालिका भवनात येणाऱ्या प्रमुख पत्रकारांना बसण्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज जागा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून कामकाज अधिक सुलभ व शिस्तबद्ध पद्धतीने होईल, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार आणि प्रशासन यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये, यासाठी नियमावली आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. स्पष्ट नियम, ओळखपत्रांची व्यवस्था आणि मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास प्रशासन व माध्यमांमध्ये समन्वय वाढेल आणि नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महापालिका प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.