तिसऱ्या आघाडीकडून प्रहार च्या हाजी जुबेर मेमन यांचा हडपसर मधून अर्ज दाखल.

PCC NEWS

तिसऱ्या आघाडीकडून प्रहार च्या हाजी जुबेर मेमन यांचा हडपसर मधून अर्ज दाखल.

पुण्यातून मुस्लिम समाजाचा आमदार विधानसभेत जाणार – जुबेर मेमन.

पुणे दिनांक: २९ ऑक्टोंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) प्रहार संघटनेचे हाजी जुबेर मेमन यांनी शक्तिप्रदर्शन करत हडपसर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

पुण्यातून मागच्या तीस वर्षात पहिला मुस्लीम समाजाचा आमदार विधानसभेत जाणार असा विश्वास यावेळी जुबेर मेमन यांनी व्यक्त केला.

कोंढवा येथून भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी ॲड जमीर कागदी (नगरसेवक),इक्बाल शेख ,मोलाना मुफ्ती अब्दुल्ला,मोलाना कारी जमील,सत्यवान गायकवाड,लुकास केदारी (आरसीएस),मल्लिका शेख, हाजी फरीद खान, पत्रकार अल्ताफ पीरजादे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे या रॅलीमध्ये तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षाचे नेते व कार्यक्रते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅली मध्ये सर्व पक्षाचे ध्व्यज घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment