मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी फारूख शेख.

PCC NEWS

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी फारूख शेख.

पिंपरी चिंचवड दिनांक : ११ ऑक्टोंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) शिवसेनेचे आकुर्डी विभाग प्रमुख फारूख शेख यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

ही नियुक्ती तीन वर्षासाठी असणार आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

फारूख शेख गेल्या 15 वर्षांपासून शिवसेना विभागप्रमुख म्हणून आकुर्डी भागात कार्यरत आहेत. नगरसेवक प्रमोद कुटे युवा मंचच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षे सामाजिक कार्यात सहभागी असतात. सर्व समावेशक व सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध आहेत. सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतात. गुणवंत विद्यार्थी सत्कार,ईद मिलन,गणेशोत्सव,ईद ए मिलाद, नवरात्रोत्सव, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी सारखे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवितात. त्यांच्या कामाची दखल घेऊन खासदार बारणे यांनी फारूख शेख यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्याची शिफारस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार फारूख शेख यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षासाठी आहे.

फारूख शेख म्हणाले, खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 वर्षांपासून समाज कार्य करत आहे. त्याला आता पदाची जोड मिळाली आहे. या पदाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी केला जाईल.

शिवसेना पक्षाचा विभागप्रमुख म्हणून काम करणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय दिला असल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment