थेरगाव परिसरात आई तुळजाभवानी माता महिला बचत गट उद्घाटन संपन्न.
पिंपरी चिंचवड दिनांक: ८ ऑक्टोंबर 2024 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) थेरगाव परिसरातील माजी नगरसेविका मनिषा पवार, सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे , नम्रता ताई भिलारे सुनीताताई मोळक विजयाताई बाबळे लक्ष्मीताई जंवजाळ, ललिता ताई जाधव यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. बचत गटाच्या अध्यक्षा वृषाली संदीप आमले यांच्या वतीने बचत गटाच्या माध्यमातून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला वृषाली आमले यांच्या संकल्पनेतून बचत गटातील सर्व महिलांपैकी एक आदर्श महिला व एक आदर्श समाजसेविका लकी ड्रॉ द्वारे निवडण्यात आल्या. यामध्ये सौ पद्मावती मुरुड यांना एक आदर्श गृहिणी म्हणून चांदीचे निरंजन व आदर्श समाजसेविका सौ रितू कांबळे यांना हळदी कुंकवाचा चांदीचा करंडा बक्षीस म्हणून देण्यात आले.या आगळ्यावेगळ्या महिला बचत गटाच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदर बचत गट कार्य करत असून यापुढे महिलांना सक्षम करण्याचे काम या बचत गटाच्या माध्यमातून होणार असल्याच्या प्रतिक्रिया याप्रसंगी उपस्थित महिलांनी दिल्या आहेत .
या कार्यक्रमाचे सर्व आयोजन बचत गटातील महिलांनी केले होते. आणि बक्षीस हे बचत गटाच्या अध्यक्षा सौ वृषाली संदीप आमले यांनी सर्व बक्षीस दिलेली होती . आई तुळजाभवानी माता बचत गटातील महिला खालील प्रमाणे सौ वृषाली आमले (अध्यक्ष) ,सौ शितलताई मोरे (उपाध्यक्ष), सौ स्वातीताई बडीगेर, (सचिव) सौ शितलताई उदावंत,,सौ तेजश्रीताई उदावंत,सौ शिल्पाताई जगताप,सौ. शितलताई लोढा,कु. उत्कर्षा लोढा,कु. यशोदा बडिगेर,सौ. लिलाबाई पवार,सौ.पद्मावती मुरुड,सौ रेश्माताई जाधव ,सौ तेजश्री शिंदे ,सौ तारा धरपळे,सौ राणी शिराळ,सौ सविता मोतेकर,सौ आशा माकर,सौ सुनीता सूर्यवंशी,सौ शोभाताई सुतार,सौ.अंजुषाताई कापसे,इतर महिला भगिनी राझिया शिलगार ,सौ स्वातीताई रोकडे ,सौ संगीता ताई लोहार ,सौ अर्चना लोढा,सौ सुनीता सुतार या महिलांनी सहभाग घेतला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु जानवी संदीप आमले यांनी केले आणि आभार प्रदर्शन शितलताई लोढा यांनी केले