आधुनिक भारताचे शिल्पकार’ पंडित जवाहरलाल नेहरू जयंती ओम साई एज्युकेशन ट्रस्टच्या OASIS इंटरनॅशनल किड्स स्कूलमध्ये उत्साहात साजरी
पिंपरी–चिंचवड : ओम साई एज्युकेशन ट्रस्ट संचालित OASIS इंटरनॅशनल किड्स स्कूलमध्ये ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
बालदिनानिमित्त शाळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.
यानंतर लहानग्यांसाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने बिझनेस मॅनेजमेंट, खाऊगल्ली, गेम शो अशा बहुरंगी उपक्रमांचा समावेश होता.
मुलांनी आविष्कारपूर्ण ‘चाचा नेहरू’ यांच्याविषयीचे प्रेम व आदर व्यक्त केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षकांनी मुलांना नेहरूंच्या कार्याची आणि बालदिनाच्या महत्त्वाची प्रेरणादायी माहिती दिली.
सर्व लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आनंदमयी वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालकांचे सहकार्य लाभले.
बालदिनाचा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरल्याची भावना शाळेतून व्यक्त करण्यात आली.
आधुनिक भारताचे शिल्पकार’ पंडित जवाहरलाल नेहरू जयंती ओम साई एज्युकेशन ट्रस्टच्या OASIS इंटरनॅशनल किड्स स्कूलमध्ये उत्साहात साजरीपिंपरी–चिंचवड : ओम साई एज्युकेशन ट्रस्ट संचालित OASIS इंटरनॅशनल किड्स स्कूलमध्ये ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.बालदिनानिमित्त शाळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.यानंतर लहानग्यांसाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने बिझनेस मॅनेजमेंट, खाऊगल्ली, गेम शो अशा बहुरंगी उपक्रमांचा समावेश होता.मुलांनी आविष्कारपूर्ण ‘चाचा नेहरू’ यांच्याविषयीचे प्रेम व आदर व्यक्त केला.शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षकांनी मुलांना नेहरूंच्या कार्याची आणि बालदिनाच्या महत्त्वाची प्रेरणादायी माहिती दिली.सर्व लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आनंदमयी वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालकांचे सहकार्य लाभले.बालदिनाचा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरल्याची भावना शाळेतून व्यक्त करण्यात आली.
