भारतीय संविधान दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष पिंपरीत उत्साहात साजरे

PCC NEWS
1 Min Read

भारतीय संविधान दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष पिंपरीत उत्साहात साजरे

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्या वतीने संविधान दिनाचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर पुष्पहार अर्पण करून संविधान दिवशी अभिवादन करण्यात आले. तसेच २६/११ मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्घांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी येथे सकाळी १० वाजता शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक संविधान प्रस्तावना वाचनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, कार्याध्यक्ष विजय लोखंडे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, प्रदेश सरचिटणीस शोभा पगारे, कामगार सेल अध्यक्ष युवराज पवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगिता कोकणे, मिरा कदम, वैद्यकीय सेल अध्यक्षा मेगाली विटकर, ॲड. राकेश गुरव, अकबर मुल्ला, रमजान सय्यद, बाळासाहेब पिल्लेवार, धनाजी तांबे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे महत्त्व, लोकशाहीची मूल्ये आणि सामाजिक समतेचा संदेश पुनः अधोरेखित करण्यात आला.

Share This Article
Leave a comment