पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांची प्रचारप्रमुखपदी नियुक्ती

PCC NEWS
1 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांची प्रचारप्रमुखपदी नियुक्ती

पिंपरी, दि. 14 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांची शहराच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भाचे अधिकृत पत्र आज (दि. 14) नाना काटे यांना सुपूर्द केले.

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्याच्या उद्देशाने, तसेच आगामी निवडणुकांमध्ये संघटन अधिक सक्षम करण्याकरिता नाना काटे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काटे हे पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसामान्यांशी सलोखा ठेवणारे, संघटन वाढविण्यात पुढाकार घेणारे आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रभावी प्रचार, पक्षाची ताकद वाढविणे आणि जनसंपर्क मोहिमा अधिक बळकट करण्यासाठी काटे यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास शहराध्यक्ष योगेश बहल यांनी व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment