त्र्यंबकेश्वर आणि पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी जनसन्मान सभेला केले संबोधित.

PCC NEWS

त्र्यंबकेश्वर आणि पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी जनसन्मान सभेला केले संबोधित.

नाशिक दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी ) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि पारनेर येथे आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी जनसन्मान सभेला संबोधित केले. मुख्यमंत्र्यांसोबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे उपस्थित होते.नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर देखील यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची भक्तीमय वातावरणात पूजा केली, मनोभावे दर्शन घेतले.

समाजातील प्रत्येक घटकाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करताना अजित पवार म्हणाले, ‘शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांची शिकवण आमच्या मनात रुजलेली आहे. त्यांच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’ अनेक नेत्यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, अजित पवार यांनी त्यांचे आभार मानत ‘राष्ट्रवादी त्यांना सन्मानाने वागवेल’, असे सांगितले.

हिरामण खोसकर यांच्या विकास कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘हिरामण खोसकर यांनी प्रगतीचा मार्ग स्वीकारला असून त्या दिशेने काम करीत आहेत, ते आमचे ध्येय बळकट करतील, ते जनतेचे आदर्श प्रतिनिधी आहेत.’
जनतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या उपक्रमांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. बळीराजा योजना राबवली, कांदा निर्यातबंदीचा प्रश्न सोडवला आणि आता कांदा-टोमॅटोच्या दरातही सुधारणा झाली आहे.

लाडकी बहीण योजनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, ‘लाडकी बहीण योजना बंद होईल, असा विरोधकांचा दावा आहे. मी तुम्हाला खात्री देतो; तसे होणार नाही; अडीच कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Share This Article
Leave a comment