काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भरत माणिकराव गावित यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नंदुरबारमध्ये पक्षाचा आदिवासी जनाधार मजबूत होणार.

PCC NEWS

काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भरत माणिकराव गावित यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नंदुरबारमध्ये पक्षाचा आदिवासी जनाधार मजबूत होणार.

नवापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी अजित पवारांसोबत आलो, माणिकराव गावित यांचा समृद्ध वारसा पुढे नेणार – भरत माणिकराव गावित.

प्रभावशाली आदिवासी नेते माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत माणिकराव गावित यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयात त्यांचा पक्षात प्रवेश केला. त्यांचे वडील दिवंगत माणिकराव गावित हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते तसेच ते उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते होते.गावित यांनी २००४ मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि २०१३ मध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

भरत माणिकराव गावित यांचा नंदुरबार भागात मोठा प्रभाव असून, त्यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षाचा आदिवासी जनाधार वाढणार आहे. सध्या ते आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे नवापूर चे अध्यक्ष आहेत, ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, तसेच लाडकी बहिण योजना नवापूर विधानसभा मतदारसंघातील समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

Share This Article
Leave a comment