राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार – लीगल सेल शहर कार्यकारणी जाहीर.
Share
1 Min Read
SHARE
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार – लीगल सेल शहर कार्यकारणी जाहीर.
पिंपरी चिंचवड दिनांक : 18 नोव्हेंबर 2024 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील वकील बांधवांच्या सहकुटुंब स्नेह मेळाव्यामध्ये भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार मा. अजितभाऊ दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट सुहास पडवळ यांच्या लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. संतोष शिंदे यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली, त्याप्रसंगी ॲड. श्रद्धा मंचरकर शहर महिला सरचिटणीस पदी, ॲड. प्रशांत बचुटे यांची शहर उपाध्यक्षपदी, एडवोकेट गजेंद्र तायडे यांची शहर सचिव पदी आणि ॲड. संघर्ष सूर्यवंशी यांची संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
महा विकास आघाडीचे उमेदवार माननीय अजित गव्हाणे यांनी वकील बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुहास पडवळ यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीस शुभेच्छा देऊन पक्ष वाढीसाठी भरीव कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.
शहराध्यक्ष ॲड. संतोष शिंदे यांनी भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार मा.अजित दामोदर गव्हाणे यांना बहुसंख्य वकील बांधवांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
मोठ्या संख्येने शहरातील वकील बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.