नगरपरिषद निवडणूक २०२५ शिवसेनेची “स्टार प्रचारक” यादी जाहीर – श्रीरंग आप्पा बारणे यांची निवड

PCC NEWS
1 Min Read
PccnewsPccnews

नगरपरिषद निवडणूक २०२५ शिवसेनेची “स्टार प्रचारक” यादी जाहीर – श्रीरंग आप्पा बारणे यांची निवड

पिंपरी–चिंचवड, दिनांक: १५ वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था – नगरपरिषद व नगर पंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची “स्टार प्रचारक” यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत शिवसेना उपनेते, महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची “स्टार प्रचारक” म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पक्ष बांधणीसाठी व प्रचार मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी “आप्पांचं खूप खूप अभिनंदन” अशा शब्दांत आनंद व्यक्त केला.

TAGGED:
Share This Article
Leave a comment